पंढरपूर : काय झाडी, काय डोंगर फेम बाळासाहेबांच्या शिवसेनेचे सांगोल्याचे आमदार शहाजी पाटील यांनी त्यांना चक्क विधान परिषदेवर पाठविण्याची भाजप नेत्याकडे मागणी केली आहे. सांगोल्याचे दिवगंत शेकापचे नेते गणपतराव देशमुख यांच्याकडून सतत पराभव स्विकारणारे शहाजी बापू पाटील हे 2019 च्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे उमेदवार गणपतराव देशमुखांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करुन अवघ्या काही मतांच्या फरकाने सांगोल्यातून शिवसेनेकडून निवडून आले आहेत. पुढच्या निवडणुकीत शेकापचे आव्हान मोठे राहणार याची जाणीव झाल्यानेच आमदार शहाजी पाटील यांनी आता विधानसभे ऐवजी विधान परिषदेवर पाठवण्याची विनंती भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्याकडे केली आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघातून विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांना आमदार करा आणि मला तुमच्या सारखं विधान परिषदेवर पाठवा अशी जाहीर मागणी आमदार पाटील यांनी भाजप नेते दरेकर यांच्याकडे केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ताजी बातमी
View all








