LIVE UPDATES

CM शिंदे उद्या सावंतवाडीत ; ३० ते ४० कोटींच्या कामांची होणार भूमिपूजनंं

Edited by: विनायक गावस
Published on: June 05, 2023 10:57 AM
views 521  views

सावंतवाडी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सकाळी १० वाजता पहिल्यांदाच सावंतवाडी शहरात येत आहेत. त्यांच्या हस्ते सुमारे ३० ते ४० कोटी रुपयांच्या कामांची भूमिपूजन करण्यात येणार आहेत. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण आमदार रवींद्र फाटक, आमदार नितेश राणे, आमदार वैभव नाईक आदी मान्यवर नेते एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार आहेत.


 मुख्यमंत्री शिंदे यांचा सावंतवाडी शहराला शंभर कोटीपेक्षा अधिक निधी दिल्याबद्दल त्यांचा जाहीर नागरी सत्कार करण्यात येणार आहे.सकाळी १० वाजता सावंतवाडी शहरातील विविध विकासकामांचे भूमिपूजन करण्यात येणार आहेत.  शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडई संकुल, हिंदुह्रदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त कै. रमाकांत आचरेकर क्रिकेट ड्रेसिंग रूम याशिवाय क्रीडा संकुलाचेही भूमिपूजन होणार आहे. तसेच दोडामार्ग रूग्णालय, सावंतवाडी शासकीय पर्णकुटी विश्रामगृह नूतनीकरण लोकार्पण करण्यात येणार आहे. याशिवाय दोडामार्ग तालुक्यातील भेडशी येथील तालुका क्रीडा संकुलाचे भूमिपूजन कार्यक्रम ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऑनलाइन पद्धतीने होणार आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026