सिंधुदुर्ग : आग्नेय अरबी समुद्रावरील हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र गेल्या ६ तासांत १३ किमी प्रतितास एवढ्या वेगाने उत्तरेकडे सरकले आहे, त्याचे रूपांतर तीव्र स्वरूपाच्या कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे आणि आज, दिनांक ०६ जून, २०२३ रोजी सकाळी ११:३० वाजता आग्नेय आणि लगतच्या पूर्वमध्य अरबी समुद्रावर ११.९°उत्तर अक्षांश आणि ६६.०° पूर्व रेखांशा जवळ सदर कमी दाब क्षेत्र केंद्रित झाले आहे,
सदर कमी दाब क्षेत्र गोव्याच्या पश्चिम-नैऋत्येस सुमारे ९३० किमी, मुंबईच्या नैऋत्येस १०६० किमी, पोरबंदरच्या ११५० किमी दक्षिण-नैऋत्येस आणि कराचीच्या दक्षिणेस १४५० किमी आहे.
पुढील ६ तासांत ते जवळजवळ उत्तरेकडे सरकण्याची आणि पूर्वमध्य अरबी समुद्र आणि लगतच्या आग्नेय भागात चक्री वादळात तीव्र होण्याची शक्यता आहे, अशी माहिती ग्रामीण कृषी मौसम सेवा, मुळदेचे प्रमुख यांनी दिलीय.
ताजी बातमी
View all








