LIVE UPDATES

राणेंची मिमिक्री अन् धुवांधार बॅटिंग !

भास्कर जाधवांचं पहिलंच तुफान भाषण
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 18, 2022 14:37 PM
views 608  views

कुडाळ : शिवसेनेच्या दोन गटातला घनघोर संघर्ष गेले काही दिवस टोकाला गेला होता.  अंधेरी पोट निवडणुकीच्या निमित्ताने कुठेतरी सौजन्य सप्ताह सुरू असल्याचे संकेत मिळू लागले असतानाच कुडाळच्या ठाकरे गटाच्या आंदोलनाने आगीत तेल ओतले आहे.  आमदार वैभव नाईक यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून चौकशी झाल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाला नेतेमंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.

मोर्चानंतर झालेल्या मेळाव्यात काही वाक्यांनी भाजप आणि शिंदे गटात वर टीका केली. मात्र यात सर्वात लक्षवेधी भाषण ठरलं ते भास्कर जाधव यांचा आमदार भास्कर जाधव हे आपल्या सडेतोड भाषणांसाठी प्रसिद्ध आहेत. कालच चिपळूण मध्ये भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी भास्कर जाधव यांची मिमिक्री केली होती त्याचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाला होता त्यामुळे आज कुणाच्या सभेत भास्कर जाधव काय बोलणार याकडे लक्ष लागून होते. 

अपेक्षेप्रमाणे भास्कर जाधव यांनी कुडाळ मध्ये तुफान बॅटिंग केली.  आपल्या भाषणात राणेंवर जोरदार हल्लाबोल केला निलेश राणे यांच्या चिपळूणमधील भाषणाचा त्यांनी चांगलाच समाचार घेतला तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची मिमिक्री केली. त्यामुळे भास्कर जाधव यांच्या भाषणाला तुफान प्रतिसाद मिळाला.  शिवसेनेतील दोन गटातील संघर्षाच्या आगीत जणू तेल ओतण्याचे काम भास्कर जाधव यांच्या या भाषणाने होणार आहे.  आता या भाषणाला शिंदे गट आणि भाजपाकडून कसे आणि कोण प्रत्युत्तर देणार याकडे लक्ष लागून आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026