LIVE UPDATES

येत्या दिवाळीत आदित्य ठाकरे ऑर्थर रोड जेलमध्ये असतील : नितेश राणे

Edited by: भरत केसरकर
Published on: July 10, 2023 14:45 PM
views 630  views

कणकवली : आज सकाळी संजय राऊत कुठली नशा करून बोलत होता याचा अंदाज येत नाही. काल रविवार असल्याचा परिणाम आज  जाणवला होता. लोकप्रभा मध्ये राऊत उद्धव ठाकरे किती खोटारडा आहे. हे गरळ संजय राऊत ओकत होता. उद्धव ठाकरे खोट बोलतात याची गिनीज  बुक मध्ये नोंद आता होईल अस वाटत आहे. याच उद्धवने शिवसेना नावाची संघटना खिळखिळी करून टाकली आहे. कपटी कारस्थानी म्हणजे उद्धव ठाकरे आहे. जो प्रामाणिक असतो त्याला शपथ घेण्याची गरज पडत नाही. जो आपल्या धर्माचा झाला नाही वडिलांना शेवटच्या क्षणात खाऊ पण दिल नाही, अशा शब्दात आमदार नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर व संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. आमदार नितेश राणे पत्रकार परिषदेत कणकवली येथे बोलत होते.

      पत्रकार परिषदेत नितेश राणे पुढे म्हणाले संजय राठोड वर किती अन्याय केला. जो नियम संजय राठोड ला लावला तो नियम आदित्य ठाकरे ला लावला गेला नाही. अमित शहा यांनी देशाला सुरक्षित ठेवण्याच काम केलं. अनेक चांगले निर्णय त्यांनी घेतले आहेत. प्रत्येक पावलावर खोट बोलणारा तुझा मालक उद्धव ठाकरे असून जी व्यक्ती बाळासाहेबांच्या खोलीत बसून ठरलेले शब्द खोटे ठरवू शकतो, तो धर्माचा होऊ शकत नाही, असा टोल उद्धव ठाकरे यांना लावला.

 उद्धव जी तुम्हारा कॅरेक्टर ढिला है. तुझ्या मातोश्री पॅटर्न मध्ये ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत दुसऱ्या कोणाला भ्रष्टाचार करण्याचा अधिकार नाही आहे. दुसऱ्यांना चोरांचा मॉल बोलण्यापेक्षा तुमचा चोरांचा बाजार उठण्याची वेळ झाली आहे. तुझ्या मालकाचा म्हणजे उद्धव ठाकरेंचा मुलगा येत्या काही दिवसात आर्थर रोड जेल मध्ये दिसणार आहे. येणाऱ्या दिवाळीत अन्य कैद्यांसोबत आदित्य नाईट लाईफ साजरी करताना दिसेल, असा इशारा दिला आहे. तर रोहित पवार यांच्यावर सुद्धा टीका केली. रोहीत पवार हा त्यांचा राहुल गांधी आहे. सुळे गटाचा पप्पू म्हणजे रोहित पवार आहे. त्याने पाहिलं आपलं घर सांभाळावे.

   तर  उद्धव ठाकरेंवर टीका करताना, चोरी करत असताना तुम्ही झोपा काढत असता का? की भ्रष्टाचार करत असता? असा टोला लगावला. शिंदे व अजित  पवार यांनी स्वाभिमानासाठी निर्णय घेतला आहे

  निवडणूक आयोगा बाबत बोलताना म्हणाले की उद्धव ठाकरे हे बालबुद्धि आहेत. वय वाढल पण बुद्धी नाही स्वतःचा बचत गट सांभाळ असा टोला लावला. 39 वर्षाचा इतिहास उध्वस्त ठाकरेना माहीत नसेल. उद्धव ठाकरेंच्या सहवासात राहून ते तसे झाले आहेत.व्यापाऱ्यांचा आणि गुजरातचा फायदा मातोश्रीला झाला नाही का?असा सवाल लगावला आहे.आयुष्य जगायचं गुजराती व्यापाऱ्यांच्या जीवावर आणि त्यांच्यावर टीका करायची हे चुकीच आहे.

    मुंबई करांच्या लुटीतून मातोश्री 2 उभं झालं आहे.जस संजय राऊत उबाटा ला संपवणार तस रोहित पवार सुळे गटाला संपवणार आहे.अशी बोचरी टीका आमदार नितेश राणेंनी केली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026