LIVE UPDATES

अखेर खातेवाटप ; पहा कोणाला कोणतं खातं ?

Edited by: ब्युरो
Published on: July 14, 2023 18:31 PM
views 820  views

मुंबई : मागील काही दिवसांपासून रखडलेले मंत्रीमंडळ खातेवाटप अखेर आज झाले आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या चर्चेनंतर खातेवाटपावर शिक्कामोर्तब झाले आहे. खातेवाटपाची फाईल राज्यपालांकडे स्वाक्षरीसाठी गेली होती.  राज्यपाल यांची स्वाक्षरी झाल्यानंतर मुख्यमंत्री यांच्या परवानगीने खातेवाटप प्रसिद्ध करण्यात आलेय. या खातेवाटपमध्ये अनेक मंत्र्यांची खाती काढण्यात आली आहे. भाजपकडून सहा तर शिंदेकडून तीन खाती गेली आहेत. एकनाथ शिंदे यांना महत्वाची खाती राखण्यात यश आलेय.  अजित पवार यांच्या गटाला शिवसेना आणि भाजप यांच्यातील काही मंत्र्यांकडील खाती येण्याची शक्यता आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग 


*उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे* गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.


*उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे* वित्त व नियोजन हे खाते राहील. 


*इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे:*


छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण

दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास

सुधीर सच्चिदानंद मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

हसन मियाँलाल मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य

चंद्रकांतदादा बच्चू पाटील - उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

विजयकुमार कृष्णराव गावित- आदिवासी विकास

गिरीष दत्तात्रय महाजन- ग्राम विकास आणि पंचायत राज, पर्यटन

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता

दादाजी दगडू भुसे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) 

संजय दुलिचंद राठोड- मृद व जलसंधारण

धनंजय पंडितराव मुंडे - कृषि

सुरेशभाऊ दगडू खाडे- कामगार

संदीपान आसाराम भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय रविंद्र सामंत- उद्योग

प्रा.तानाजी जयवंत सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र दत्तात्रय चव्हाण – सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), 

अब्दुल सत्तार- अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन

दीपक वसंतराव केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा

धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम – अन्न व औषध प्रशासन

अतुल मोरेश्वर सावे – गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज शिवाजीराव देसाई- राज्य उत्पादन शुल्क

कु. अदिती सुनिल तटकरे – महिला व बालविकास

संजय बाबुराव बनसोडे – क्रीडा व युवक कल्याण, बंदरे

मंगलप्रभात लोढा- कौशल्य विकास, उद्योजकता व नाविन्यता

अनिल पाटील – मदत पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन.


अजित पवार गटाचे खातेवाटप यादी... 

अजित पवार, उपमुख्यमंत्री अर्थ आणि नियोजन
संजय बनसोडे - क्रीडा
आदिती तटकरे - महिला बालविकास मंत्रालय
हसन मुश्रीफ - वैदकीय शिक्षण
अनिल पाटील - मदत पुनर्वसन
दिलीप वळसे पाटील - सहकार
धनजंय मुंडे - कृषी खाते
छगन भुजबळ - अन्न आणि नागरी पुरवठा
धर्मरावबाबा आत्रम - अन्न व औषध पुरवठा


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026