LIVE UPDATES

अच्युत सावंत-भोसले यांना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचा 'महाराष्ट्र महागौरव पुरस्कार' जाहीर

महाबळेश्वर इथं मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते होणार पुरस्कार प्रदान सोहळा
Edited by: विनायक गांवस
Published on: October 21, 2022 17:22 PM
views 774  views

सिंधुदुर्ग : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचा अच्युत सावंत-भोसले यांना 'महाराष्ट्र महागौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी या पुरस्काराची मुंबईत घोषणा केली. संघटनेचे पाहिले अधिवेशन २९ ला महाबळेश्वर इथं होत असून महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वितरण होणार आहे.

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर (भिलार) येथे २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनामध्ये उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार छत्रपती उदयनराजे भोंसले, पालकमंत्री शंभूराजे देसाई, माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

यावेळी महाराष्ट्र महागौरव पुरस्कारांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत वितरण होणार असून भोसले नॉलेज सिटीच्या माध्यमातून कोकणाच नाव जगभरात पोहचणारे, शिक्षण क्षेत्रात क्रांती घडवून आणणारे BKC ब्रॅण्डचे शिल्पकार अच्युत सावंत-भोसले यांचा 'महाराष्ट्र महागौरव पुरस्कारानं सन्मान केला जाणार आहे. हा मानाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघ, सिंधुदुर्ग जिल्हा  कार्यकारिणीकडून अच्युत सावंत-भोसले यांच अभिनंदन करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026