LIVE UPDATES

दुर्जनांचा महाकाल, भक्तांसाठी ढाल ! ; क्षेत्रपाल श्री देव वेतोबा सिरिअलचं जल्लोषी स्वागत

Edited by: विनायक गावस
Published on: July 18, 2023 11:56 AM
views 931  views

सावंतवाडी : 'सन मराठी’ ह्या  वाहिनीने प्रेक्षकांची मने जिंकायची असा निश्चयच केला आहे. ‘सोहळा नात्यांचा’ हे ब्रीदवाक्य जपत प्रेक्षकांच्या आनंदासाठी नेहमी एक पाऊल पुढे असणा-या ‘सन मराठी’ वाहिनीने प्रेक्षकांना आयुष्यभर पुरेल असा एक अविस्मरणीय अनुभव सावंतवाडीला दिला.  निमित्त होते 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा' मालिकेच. १७ जुलैपासून संध्याकाळी ७ वाजता, ‘सन मराठी’ वाहिनीवर ही नवी मालिका सुरु झाली आहे.

कोकणातील जागृत देव 'क्षेत्रपाल श्री देव वेतोबा' या मालिकेच्या लाँच प्रित्यर्थ सावंतवाडीतील मोती तलाव येथे पहिल्यांदाच देव वेतोबाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली होती. वेतोबाचे वर्णन अनेकांनी त्यांच्या भावनेतून, अनुभवातून केले आहे. पण आपल्या डोळ्यांसमोर वेतोबाची भव्य दिव्य प्रतिकृती पाहणे हा प्रेक्षकांसाठी विलक्षण अनुभव होता. प्रतिकृतीसमोर श्री देव वेतोबा यांच्या महाआरतीचा क्षणही प्रेक्षकांना अनुभवता आला. सावंतवाडी संस्थानचे राजेसाहेब खेमसावंत भोसले, राणीसाहेब सौ. शुभदादेवी भोसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांच्या हस्ते वेतोबाचे पूजन झाले. मान्यवरांच्या उपस्थितीत आरतीही करण्यात आली.


प्रेक्षकांना गेल्या कित्येक दिवसांपासून 'क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा' ह्या मालिकेबाबत उत्सुकता लागून राहिली होती. अखेर 'क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा' मालिकेचा प्रवास सुरु झाला आहे. कोकणचा रक्षणकर्ता या नात्याने, श्री देव वेतोबा कोकणात अजूनही वास करतो असा अनेकांचा विश्वास आहे. वेतोबा वर लोकांची मनापासून श्रध्दा आहे. दरम्यान , वैश्य भवन हॉल,गवळीवाडा, सावंतवाडी येथे  'क्षेत्रपाल श्रीदेव वेतोबा' मालिकेतील कलाकार उमाकांत पाटील (वेतोबा), राजेश भोसले (बाबी रेडकर), प्राजक्ता वाडये (बायो रेडकर), दिपक कदम (धाकल्या सोनार), विवेकानंद गोरे (खोत), पूजा महेंद्र (मंजू) आणि अनिल गावडे (दादा परब) या ठिकाणी उपस्थित होते. या सर्व कलाकारांसोबत पहिला भाग बघण्याचा कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला होता. आपल्या लाडक्या आणि मानाच्या वेतोबाला पहिल्यांदाच छोट्या पडद्यावर पाहून भावुक झालेल्या सावंतवाडीकरांनी "आमच्या डोळ्याचे पारणे फिटले" अशा शब्दांत आपल्या भावना व्यक्त करत मालिकेच्या संपूर्ण टीमला प्रेम, शुभेच्छा आणि आशिर्वाद दिला. निलेश मयेकर यांनी या मालिकेची निर्माती केली आहे. सन मराठी वाहिनीने कोकणचे आराध्य दैवत श्रीदेव वेतोबा यांची महती जगासमोर आणण्याचा मानस केला आहे. त्यासाठी कोकणवासीयांनी मोलाची साथ देण्यासाठी “क्षेत्रपाल श्री देव वेतोबा” मालिका  सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता फक्त सन मराठीवर पहावी असं आवाहन केलं आहे.

यावेळी इनरव्हील क्लब सावंतवाडी अध्यक्षा रिया रेडीज, माजी नगरसेविका दीपाली भालेकर, वेतोबा देवस्थानचे अध्यक्ष जयवंत राय, डॉ. प्रसाद प्रभू-साळगावकर, मोहिनी मडगावकर, रमेश बोंद्रे, आरवली पोलीस पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने मान्यवर उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026