LIVE UPDATES

केंद्रिय गृहराज्यमंत्री अमित मिश्रा बुधवारी वेंगुर्ला दौ-यावर

वेंगुर्ला भाजपची माहिती
Edited by: दिपेश परब
Published on: July 18, 2023 19:55 PM
views 575  views

वेंगुर्ला : लोकसभा प्रवास योजना २०२४ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय गृहराज्यमंत्री अमित मिश्रा १९ जुलै रोजी वेंगुर्ला दौ-यावर येत असून ते परबवाडा बुथ नं.५७ वर बुथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन संवाद साधणार आहेत. तसेच शहरातील विकासकामांना भेटी देऊन पहाणी करणार असल्याची माहिती भाजपा जिल्हा सरचिटणी प्रसन्ना देसाई यांनी पत्रकारांना दिली.

केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या दौ-यानिमित्त वेंगुर्ला तालुका भाजपा संफ कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेवेळी प्रदेश सचिव शरद चव्हाण, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, सरचिटणीस साईप्रसाद नाईक, बाबली वायंगणकर, अल्पसंख्यांक सेलचे  तालुकाध्यक्ष सायमन आल्मेडा, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडीस, खानोली सरपंच प्रणाली खानोलकर, परबवाडा उपसरपंच पपू परब आदी उपस्थित होते. देशात १४४ लोकसभा मतदार संघात भाजपाचे आमदार नाहीत. महाराष्ट्रात १८ मतदार संघात भाजपाचे आमदार नाहीत. ज्या ज्या लोकसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार नाहीत अशा चार चार मतदार संघाचे क्लस्टर करण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्या संयोजकपदी माजी मंत्री बाळासाहेब झगडे यांची नियुक्ती केली आहे. सहसंयोजक प्रमोद जठार असून रत्नागिरी व सिधुदुर्गचे संयोजक अतुल काळसेकर आहेत. या सर्वांच्या नेतृत्वाखाली लोकसभा प्रवास योजनेचे काम सुरू आहे. अजय मिश्रा यांनी सिधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात यापूर्वी दौरा केला होता. मात्र, ते वेंगुर्ल्यात आले नव्हते. त्यामुळेच ते १९ जुलै रोजी वेंगुर्ल्यात प्रथमच येत आहेत.

१९ रोजी सायंकाळी ४ वाजता ते वेंगुर्ला न.प.च्या स्वच्छ पर्यटन स्थळाला भेट देणार आहेत. त्यानंतर न.प.च्या कलादालनास भेट, ५ वा. परबवाडा बुथ नं.५७ वर बुथ कार्यकर्त्यांची बैठक घेऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधणारण आहेत. त्यानंतर शहरातील विविध विकास कामांना भेटी देणार असल्याची माहिती प्रसन्ना देसाई यांनी दिली.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026