LIVE UPDATES

सिंधुदुर्गातल्या गावपळणीच्या प्रथेवर थरारक प्रेमकथा...'प्रेम प्रथा धुमशान'

दि. 4 रोजी राज्यातल्या ३५० चित्रपटगृहात होणार प्रदर्शित
Edited by: उमेश बुचडे
Published on: October 21, 2022 20:27 PM
views 608  views

कणकवली : सिंधुदुर्गातल्या गावपळणीची अनोखी प्रथा आणि त्या दरम्यानची थरारक प्रेमकथा आता मोठ्या पडद्यावर येत आहे. राष्ट्रीय पुरस्काप्राप्त अभिजीत मोहन वारंग दिग्दर्शित "प्रेम प्रथा धुमशान" या चित्रपटातून गावपळणीची प्रथा पहिल्यांदाच दिसणार असून,  ४  नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार होणार असल्याची  माहिती राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपट दिग्दर्शक अभिजीत मोहन वारंग यांनी दिली.

कणकवली येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी अभिनेत्री, कॉमेडीची हास्यजत्रा फेम शिवाली परब,अभिनेता विनायक चव्हाण, अभिनेता मिलिंद गुरव, अभिनेता विश्वजित पालव आदी उपस्थित होते.

ऑक्सिजन फिल्म्स, डायनॅमिक पिक्चर्स, आरव्हीके फिल्म्स यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. सत्या अय्यर हे चित्रपटाचे निर्माते, तर स्वरा अभिजीत वारंग, रचना विज, मोहित, नमन तलवार सहनिर्माते आहेत. अभिजीत मोहन वारंग यांच्या 'पिकासो' या पहिल्याच चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर एकच अभिनेता असलेला 'देजावू' हा अत्यंत प्रयोगशील चित्रपट त्यांनी केला. आता ते 'प्रेम प्रथा धुमशान' हा नवा चित्रपट घेऊन येत आहेत. 

या चित्रपटात महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परबसह विनायक चव्हाण, अभय खडपकर, अभय नेवगी, मिलिंद गुरव, विश्वजित पालव, विद्याधर कार्लेकर, निकिता सावंत, कल्पना बांदेकर असे दमदार कलाकार काम करत आहेत. 

तसेच चेतन शिंदे यांनी छायांकन, आनंद लुंकड यांना संगीत दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटातलं "धुमशान घाला रे" हे मालवणी गाणं सध्या सगळीकडे वाजत आहे.सिंधुदूर्ग जिल्ह्यात गावपळण ही अनोखी प्रथा पाळली जाते. गावपळण प्रथा पाळणाऱ्या गावातील ग्रामस्थ एका ठरावीक काळासाठी गाव सोडून दुसरीकडे राहायला जातात. या प्रथेबाबत अनेक वंदता आहेत. मात्र आजही ही प्रथा पाळली जाते. या प्रथेबरोबरच एक प्रेमकथा गुंफून प्रेमप्रथा धुमशान हा चित्रपट तयार झाला आहे. मात्र या प्रेमकथेला विरोधाची किनार आहे. या प्रेमकथेत संघर्ष, विरोध आहे, श्रद्धा-अंधश्रद्धेचा झगडा  असं सारं काही असल्याचं ट्रेलरमध्ये पाहायला मिळतं. गावपळण या प्रथेविषयीच मोठी उत्सुकता आहे. त्यामुळे या प्रथेची पार्श्वभूमी असलेली प्रेमकथा हा बोनस ठरणार आहे. त्यामुळेच अस्सल मालवणी भाषेतला,लोकसंस्कृतीवर आधारित "प्रेम प्रथा धुमशान" नक्कीच बॉक्स ऑफिसवर नक्कीच धुमशान  घालणार यात शंका नाही,असा विश्वास अभिजीत मोहन वारंग यांनी व्यक्त केला.

हा चित्रपट सपूर्ण मातीतील आहे.चित्रपट पाहिल्यानंतर वाद मिविण्यासाठी मदत होईल,कोकणातील आचरा येथील ७ दिवस लोक बाहेर राहतात.पारपरिक पद्धतीने गावपळण ८०० वर्षा पासुन बाहेर जात आहे.लॉकडाऊन करण्याची ही पद्धत आहे.रोगराई कमी होण्यासाठी प्रयत्न आहे.राज्यात ३५० चित्रपट गृहात प्रदर्शित होत आहे.लोकांनी हा चित्रपट नक्की पहावा,असे आवाहन दिग्दर्शित चित्रपट अभिजीत वारंग यांनी केलं.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026