LIVE UPDATES

अकरा हजार दिव्यांनी तेजोमय झाले कुणकेश्वर शिवतीर्थ !

दीपोत्सव सोहळ्यास भाविकांनी केली अलोट गर्दी !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 26, 2022 20:42 PM
views 597  views

देवगड : दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने श्रीक्षेत्र कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट कुणकेश्वर सेवा मंडळ मुंबई कुणकेश्वर ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले. 11 हजार पणत्याचे दिवे लावून श्री देव कुणकेश्वर मंदिर परिसर तेजोमय करण्यात आला. कुणकेश्वर ग्रामस्थांसह नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला.


कुणकेश्वर मधील ज्येष्ठ आंबा बागायतदार अजय नानेरकर, मोहन वातकर,गणेश वाळके,संजय आचरेकर, हेमंत भुजबळ,राजू बोंडाले,देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष संतोष लबदे, उपाध्यक्ष दिनेश धुवाळी खजिनदार अभय पेडणेकर सचिव शरद वाळके सरपंच चंद्रकांत घाडी यांच्या यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली.


या सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या असंख्य भाविकांनी देखील हा दीपोत्सव डोळ्यातील दीप प्रज्वलित करण्याचा आनंद लुटला . दीपावली पाडवा आणि त्याच दिवशी भाऊबीज असून देखील दीपोत्सव सोहळ्यास भाविकांनी अलोट गर्दी केली. कुणकेश्वर मंदिर परिसरात पालखीसह अनेक धार्मिक कार्यक्रम यावेळी पार पडले. श्री देव कुणकेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने दीपोत्सव सोहळ्यासाठी उपस्थित असलेल्या सर्व भाविकांचे आभार व्यक्त करण्यात आले.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026