LIVE UPDATES

डिजिटल मीडियाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी महेंद्र कासेकर

कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी कार्यकारणी केली जाहीर
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 27, 2022 20:23 PM
views 583  views

सिंधुदुर्ग : डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर (भिलार) येथे शनिवारी २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होत असून कोकण विभागातून मोठ्या संख्येने सदस्य यावेळी उपस्थित राहणार आहेत. याच पार्श्वभूमीवर डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र राज्यची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली होती. यानंतर रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी जाहीर केली आहे. डिजिटल मीडियाच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी महेंद्र कासेकर यांची तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत घोणसे पाटील, सचिवपदी स्वप्निल घाग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शनिवारी २९ ऑक्टोबर रोजी साताऱ्यात देशातील पहिले डिजिटल मीडियाचे अधिवेशन होत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी असणार आहे. याच पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.


 रत्नागिरी जिल्हा कार्यकारणी जिल्हाध्यक्षपदी महेंद्र कासेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर उपाध्यक्षपदी लक्ष्मीकांत घोणसे पाटील, सचिव स्वप्निल घाग, प्रसिध्दी प्रमुख संदेश सप्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर अमोल मोरे, जितेश कोळी, सिद्धेश शिगवण, राहुल वर्दे, संतोष कुळे, संदीप बांद्रे, सौ. समिधा बांडागळे यांची कार्यकारिणी सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी रत्नागिरी जिल्ह्याची कार्यकारिणी जाहीर केली असून डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या पहिल्या राज्यस्तरीय अधिवेशनाला कोकण विभागातील पदाधिकारी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

संस्थापक अध्यक्ष राजा माने, कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांच अभिनंदन केले आहे.  


डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन महाबळेश्वर (भिलार) येथे शनिवारी २९ ऑक्टोबर २०२२ रोजी होत असून या अधिवेशनाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. अधिवेशनात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, शिक्षणमंत्री दीपक केसरकर, साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई, माजी राज्यपाल खा. श्रीनिवास पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026