LIVE UPDATES

डिजिटल मिडियाच्या देशातील पहिल्या अधिवेशनासाठी महाबळेश्वर-भिलार सज्ज !

▪️ कोकणातून संघटनेचे शेकडो पदाधिकारी रवाना : सागर चव्हाण, कोकण विभाग अध्यक्ष
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 28, 2022 20:56 PM
views 539  views
हायलाइट
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार उद्घाटन
महाराष्ट्र महागौरव पुरस्कार करण्यात येणार प्रदान
'डिजिटल मीडिया - नवे माध्यम' या विषयावर होणार परिसंवाद

कोकण : डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटना, महाराष्ट्रचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन २९ ऑक्टोबर रोजी भिलार महाबळेश्वर येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होत असून कोकण विभागातून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील संघटनेचे पदाधिकारी रवाना झाले आहेत. पुस्तकांचं गाव भिलार महाबळेश्वर येथे अधिवेशन होत आहे. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सकाळी 10 वाजता होणार आहे.  या अधिवेशनास उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोंसले, सिक्कीमचे माजी राज्यपाल खासदार श्रीनिवास पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यादरम्यान 'महाराष्ट्र महागौरव पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रदान केले जाणार आहेत. 


या अधिवेशनासाठी राज्यभरासह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातून संपादक, पत्रकार मोठ्या संख्येने रवाना झाले आहेत. या अधिवेशनात 'डिजिटल मीडिया - नवे माध्यम' या विषयावर परिसंवाद आयोजित केला असून या परिसंवादामध्ये जलतज्ञ अनिल पाटील, ॲडव्होकेट अतुल पाटील, प्राध्यापक विशाल गरड, माहिती जनसंपर्क पुणे विभागाचे उपसंचालक डॉ. पुरुषोत्तम उर्फ राजू पाटोदकर, यांचे मार्गदर्शन लाभणार आहे.


यावेळी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी केलेल्या व्यक्तींना ''महाराष्ट्र महागौरव'' पुरस्कार २०२२ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. यामध्ये कराड येथील डॉ. सुरेश भोसले, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, निर्माता-दिग्दर्शक मंगेश देसाई, श्रीमती चेतना सिन्हा, दिग्दर्शक बापूराव कऱ्हाडे, उस्मानाबाद येथील डॉ. प्रतापसिंह पाटील, सिंधुदुर्गचे अच्युत सावंत-भोंसले, सोलापूरचे श्रीकांत मोरे, नागपूर येथील डॉ. संजय उगेमुगे यांचा सन्मान होणार आहे.


यासह विशेष सन्मान म्हणून पत्रकार दीपक भातुसे, युवा उद्योजक गणेश राऊत, पाचगणीच्या नगराध्यक्ष लक्ष्मीताई कराडकर, कोल्हापूर येथील यशवंत पाटील, सातारा जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, सामाजिक कार्यकर्ते सरदार पांडुरंग बंगे, सामाजिक कार्यकर्ते संताजी घोरपडे, सांगोल्याचे मुख्याधिकारी कैलास केंद्रे, प्राथमिक शिक्षक हणमंत काटकर, महाबळेश्वरच्या मुख्याधिकारी पल्लवी भोरे पाटील, उद्योजक लालासाहेब शिंदे, परतवाडी येथील नरसिंग दिसले, शिक्षणाधिकारी किरण लोहार, उद्योजक मनीषा यांग विशेष सन्मानित करण्यात येणार आहे. डिजीटल मीडीया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच पहिलं राज्यस्तरीय अधिवेशन 'न भूतो न भविष्यती' अस होणार असल्याचा विश्वास संस्थापक अध्यक्ष राजा माने, कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.




ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026