LIVE UPDATES

BIG BREAKING | किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी

एसआरए घोटाळा प्रकरण | किरीट सोमय्या यांनी काय केलंय ट्वीट?
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 28, 2022 22:16 PM
views 523  views

मुंबई : मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांची पोलिसांकडून चौकशी करण्यात आली आहे. दादर पोलिसांनी किशोरी पेडणेकर यांची चौकशी केली. एसआरए घोटाळयासंदर्भात ही चौकशी झाल्याचं कळतंय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी किशोरी पेडणेकर यांच्यावर एसआरए घोटाळ्याचे आरोप केले होते. याप्रकरणी उद्या पुन्हा किशोरी पेडणेकर यांची चौकशी होणार आहे.


दादर पोलीस ठाण्यात एसआरए घोटाळा प्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती. किरीट सोमय्या यांनी आज सकाळीच यासंदर्भात एक ट्विट केलं होतं. भाऊबीजेला किशोरी पेडणेकर यांनी दिलेल्या शुभेच्छा बद्धल आभार मानतो, पण माझ्यासाठी नेहमीच राष्ट्र प्रथम आहे. किशोरी पेडणेकर यांनी अनधिकृतरित्या वरळी गोमाता जनता SRA मध्ये 6 गाळे/ सदनिका हस्तगत केल्या आहेत, मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विनंती केली की या सदनिकांचा ताबा घ्यावा, असं सोमय्या यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. 


मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्या किश कॉर्पोरेट प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने वरळी इथल्या गोमाता जनात SRA मध्ये काही गाळे हडप केले तर काही गाळे बेनामी हस्तगत केल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. तसंच किशोरी पेडणेकर यांनी 2017 मध्ये महापालिका निवडणूक नामांकन पत्रात त्यांचं रहिवाशी ठिकाण वरळी गोमाता जनात एसआरएच्या सहाव्या मजल्याच्या सदनिकेचा पत्ता दिला होता. 


एसआरएची गोमाता जनता एसआरएमध्ये जे लाभार्थी होते त्यात लोकांच्या यादीत पेडणेकर परिवाराचं नाव नाही. लाभार्थी नसतानाही किशोरी पेडणेकर यांनी अश्या प्रकारे असे अनेक गाळे आपल्या ताब्यात घेतल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026