LIVE UPDATES

आता मुंबईत मिळणार अल्लू अर्जुन ज्यूस !

मुंबईतील लोकप्रिय बंटी ज्यूस सेंटरने आणले अल्लू अर्जुनच्या नावाचे ज्यूस!
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: October 29, 2022 16:34 PM
views 543  views

मुंबई : 'पुष्पा' या पॅन इंडिया चित्रपटाने संपूर्ण देशाला वेड लावले. 'पुष्पा'स्टार अल्लु अर्जुनच्या चाहत्यांमध्ये दिवसेंदिवस भर पडत आहे. अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये आपले त्याच्यावरचे प्रेम दाखवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारे चढाओढ सुरू असते. यामध्ये भर पडली आहे मुंबईतील  प्रसिद्ध बंटी ज्यूस सेंटरची. बंटी ज्यूस सेंटरचा चालक असलेला बंटी, अल्लू अर्जुनाचा खूप मोठा चाहता असून त्याने आपल्या ज्यूस सेंटरमध्ये अल्लू अर्जुनच्या नावाने विविध पेये सादर केली आहेत. अल्लू अर्जुनचे डायलॉग आणि प्रतिमा असलेल्या विशेष ग्लासमध्ये हे ज्यूस सर्व्ह करण्यात येत असून त्यावर ग्राहकांच्या उड्या पडत आहेत.


अल्लू अर्जुनवर असलेले आपले प्रेम अशा प्रकारे दर्शवण्याचे कारण विचारले असता बंटी ज्यूस सेंटरचे बंटी म्हणाले की, "अल्लू अर्जुन सरांच्या पहिल्या चित्रपटापासूनच मी त्यांचा खूप मोठा चाहता आहे. मला त्यांचे सगळे डायलॉग आवडतात पण 'पुष्पा' मधील "फायर है, झुकेगा नही" हा डायलॉग माझा आवडता आहे. 


'पुष्पा' चित्रपट देशभर यशस्वी झाल्यानंतर, अल्लू अर्जुनची लोकप्रियता आणि स्टारडम आकाशाला भिडले आहे. एवढेच नव्हे तर, चित्रपटातील त्याच्या 'पुष्पा'लूकने गणेश चतुर्थी दरम्यान देशभरातील भगवान गणेशाच्या मूर्तींनाही प्रेरणा दिली होती. अल्लू अर्जुनच्या फॅन क्लबने गणपतीच्या मूर्तींची छायाचित्रे आणि व्हिडिओ शेअर केले होते, जिथे गणपती बाप्पांना 'पुष्पा'सारख्या पांढऱ्या कुर्ता-पायजमामध्ये पाहायला मिळेल. तसेच, 'पुष्पा'मधील ब्लॉकबस्टर गाणी सामी सामी आणि श्रीवल्ली यांनी नवरात्रीदरम्यान आपले वर्चस्व गाजवले. दिवाळीतही सुपरस्टार अल्लू अर्जुनचा चेहरा असलेले फटाके देशभर विकले गेले. 


अलीकडेच, पुष्पाच्या दुसर्‍या भागाची घोषणा झाली असून, अल्लू अर्जुनचे चाहते त्याला पुन्हा एकदा 'पुष्पा'च्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रतीक्षा करत आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026