LIVE UPDATES

चक्क मिसेस मुख्यमंत्र्यांनाच ट्राफिक जामचा फटका !

महाबळेश्वरमधल्या वेण्णा लेक परिसरात ट्रॅफिकमुळं तब्बल दीड तास अडकून राहिल्या लता एकनाथ शिंदे !
Edited by: प्रतिनिधी
Published on: October 29, 2022 18:56 PM
views 570  views

सातारा : महाराष्ट्राचं मिनी काश्मीर अशी ओळख असलेलं महाबळेश्वर शहर दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे फुल्ल झाल्याचं पाहायला मिळतंय.त्यामुळं अनेक ठिकाणी ट्रॅफिक जाम झालंय. याचा फटका मिसेस मुख्यमंत्र्यांनाही बसला. महाबळेश्वरमधील वेण्णालेक परिसरात झालेल्या ट्राफिक जाममुळं लता एकनाथ शिंदे सुमारे दीड तास अडकून पडल्या.


दिवाळीनंतर येणाऱ्या सुट्ट्यांमध्ये पर्यटक महाबळेश्वरची आल्हाददायक गुलाबी थंडी अनुभवताना पाहायला मिळत आहेत. मात्र महाबळेश्वरमध्ये झालेल्या पर्यटकांच्या गर्दीमुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली. शुक्रवारी चक्क मिसेस मुख्यमंत्री लता शिंदे यांना या ट्राफिक जामचा सामना‌ करावा लागला.


महाबळेश्वमधील वेण्णा लेक परिसरात झालेल्या ट्राफिक जाममुळे मिसेस शिंदे सुमारे दीड तास अडकून पडल्या होत्या. यामुळे मुख्यमंत्र्यांच्या पत्नीलाच ट्राफिक जामचा असा सामना करावा लागत असेल तर सामान्यांचे काय हाल होत असतील? असा प्रश्न पर्यटक उपस्थित करत आहेत.


वेण्णालेक परिसर हा नौका विहारासाठी प्रसिद्ध आहे. यामुळे या ठिकाणी पर्यटकांची चांगलीच रेलचेल असते. पाचगणीकडून येणारं ट्राफिक आणि नौका विहार, घोडे सवारीसाठी आलेले पर्यटक यांच्यामुळे या ठिकाणी कायमच वाहतूक कोंडी होत असते. यामुळे यावर पर्यायी रस्ता होणं अत्यंत गरजेचं आहे.


वास्तविक पाहायला गेलं तर या ठिकाणी जादा ट्राफिक पोलिसांची गरज असताना सुद्धा दोन पोलिस ट्राफीक कंट्रोल करत असतात. यामुळं या ठिकाणी सावळा गोंधळ निर्माण होतो आणि पर्यटक तासनतास अडकून पडतात.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026