मुंबई : वेदांता फायरफॉक्स पाठोपाठ टाटा एअरबस प्रकल्प सुद्धा गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी नाचक्की झाली. अशातच आता महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) मिहानमध्ये मोठ्या स्वरूपातील नवीन गुंतवणूक आणण्यात अपयशी ठरत आहे. मिहानला डिफेन्स एव्हिएशन हब म्हणून विकसित करण्याचे स्वप्न दाखवण्यात आले होते. पण, प्रशासनाच्या दिरंगाईमुळे सॅफ्रन प्रकल्प हैदराबादला गेला आहे.
विमान तसंच रॉकेटचे इंजिन बनविणारी फ्रेंच बहुराष्ट्रीय कंपनी सॅफ्रन ग्रुप मिहानमध्ये येण्यास उत्सुक होती. परंतु, प्रशासकीय विलंबामुळे सुमारे 1,185 कोटींची प्राथमिक गुंतवणूक असलेला प्रकल्प आता हैदराबादला गेला आहे. एरोस्पेस आणि संरक्षणसंबंधित उपकरणे तसंच त्यांचे घटक बनविणाऱ्यांमध्ये सॅफ्रन ग्रुपचे नाव अग्रस्थानी आहे. या कंपनीने एमआरओ सुरू करण्यासाठी भारतातील काही ठिकाणांची यादी निश्चित केली होती. त्यामध्ये नागपूर येथील मिहानचा देखील समावेश होता.
कंपनीने जागेसाठी एमएडीसीशी संपर्क देखील केला. परंतु, जागेशी संबंधित विलंबामुळे हा प्रकल्प आता हैदराबाद येथे गेला आहे. काही महिन्यांपूर्वीच कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ऑलिव्हीर आंद्रेस यांनी केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन हैदराबाद येथील प्रकल्पाबाबत माहिती दिली. आज घडीला मिहानमध्ये टाटा फ्लोअर बिम, रिलायन्स-डसॉल्ट फाल्कनचे सुटे भाग बनवित आहे. एअर इंडिया आणि इंदमार या दोन कंपन्याचे एमआरओ विमानांच्या देखभाल-दुरुस्तीचे काम पाहतात. या चार युनिटशिवाय डिफेन्स एव्हिएशन क्षेत्रातील एकही मोठी कंपनी गेल्या काही वर्षांत येथे आलेली नाही. ज्या कंपन्या येण्यास इच्छुक आहेत, त्यांना जागा मिळण्यात विलंब होणे, जागा मिळाल्यानंतर अप्रोच रोड नसणे, आदी समस्यांचा सामना करावा लागत आहे.
भारतीय आणि परदेशी व्यावसायिक विमान कंपन्या लिप - १ ए आणि लिप - १ बी या प्रकारची इंजिने वापरतात. त्यांची देखभाल आणि दुरुस्ती या एमआरओमध्ये होणार आहे. यासाठी १,१८५ कोटींची थेट परदेशी गुंतवणूक आहे. या एमआरोमुळे प्रत्यक्ष ५००-६०० उच्च कुशल रोजगार निर्माण होणार आहेत.
ताजी बातमी
View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026

रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या
View all
Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026





