LIVE UPDATES

गौरवास्पद ! अनिरुद्ध हडकर यांना महाराष्ट्र कारागृह सन्मान चिन्ह प्रदान !

Edited by: ब्युरो
Published on: September 08, 2023 17:58 PM
views 733  views

सिंधुदुर्ग :  मुंबई येथे कारागृह उपमहानिरीक्षक कार्यालय येथे वाहन चालक म्हणून कार्यरत असलेले अनिरुद्ध हडकर यांच्या कार्याची दखल घेत त्यांचा विशेष सन्मान करण्यात आलाय. महाराष्ट्र कारागृह सन्मान चिन्ह शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते प्रदान करत त्यांना गौरविण्यात आलंय. मूळचे मालवण तालुक्यातील हडी, भटवाडी येथील आहेत. 

 सावंतवाडी जेल,अर्थर रोड जेल व सिंधुदुर्ग जेल येथे कर्तव्य बजावत असताना आरोपींना माणूस म्हणून वागणूक देत त्यांच्यामधील कलागुणांना वाव देण्याचं काम श्री हडकर यांनी केलं. आरोपींकडून जेलमध्ये काम करुन घेउन त्यांच्यात योग्य परिवर्तन घडवून आणले. सिंधुदुर्ग जेलमध्ये तर भगीरथ ग्रामविकास प्रतिष्ठानच्या सहयोगाने कैद्यांना घेऊन शेती व भाजीपाला पिकवला. कोरोना काळात स्वतः कोरोना बाधित न होता आरोपींना उपचारांसाठी सिव्हिल हॉस्पिटल मध्ये ने - आण करणे त्या करीताही कोरोना योद्धा म्हणून कारागृह प्रशासनाने प्रशंसा पत्र देत त्यांच्या कामाचा सन्मान केला. या सर्व कार्याचा लेखाजोखा पाहून हे महाराष्ट्र कारागृह सन्मान चिन्ह प्रदान केले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026