LIVE UPDATES

शहीद सुभेदार सुनिल सावंत यांच्यावर कारिवडेत शनिवारी अंत्यसंस्कार

Edited by: विनायक गावस
Published on: September 15, 2023 12:09 PM
views 1051  views

सावंतवाडी : पंजाब येथे शहीद झालेले १९ मराठा बटालियनचे जेसीओ सुभेदार,  कारिवडे गावचे सुपुत्र सुनिल राघोबा सावंत यांचे पार्थिव शनिवारी सकाळी ११:४५ च्या सुमारास कारीवडे गावात आणण्यात येणार असून शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.

कारिवडे गावातून तात्या सावंत आणि प्रमोद राऊळ हे दिल्लीला गेले असून शहीद सुनिल सावंत यांचे पार्थिव पंजाब येथून दिल्ली विमानतळावर आणण्यात येणार आहे. त्यानंतर शनिवारी सकाळी ७:५५ मिनिटांनी दिल्ली विमानतळावरून त्यांचे पार्थिव अडीच तासांच्या प्रवासानंतर सकाळी १०:२५ वाजता गोवा मोपा विमानतळावर पोहोचणार आहे. नंतर त्यांचे पार्थिव कारिवडे गावात आणण्यात येणार आहे. त्यानंतर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026