LIVE UPDATES

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमास परवानगी नाकारली

Edited by: ब्युरो
Published on: September 22, 2023 18:08 PM
views 2718  views

कणकवली :  प्रसिद्ध नृत्यागंना गौतमी पाटील हिच्या गणेश उत्सव काळातील कार्यक्रमाला पोलिसांकडून आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागाकडून परवानगी नाकारण्यात आली असल्याची माहिती कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिली आहे. गणेशोत्सव काळात मोठ्या प्रमाणत जिल्ह्यात कार्यक्रम असतात आणि यावेळी पोलिसांवर मोठा ताण असतो. आजपर्यंतचा गौतमी पाटील यांचे कार्यक्रम पाहिला तर अतिउत्साही लोकांकडून निर्माण होणारा गोंधळ या सर्व पार्श्भूमीवर पोलिसांनी कार्यक्रमाला परवानगी नाकारली आहे. 

तर येत्या काही दिवसात सिंधुदुर्ग जिल्हात देखील गौतमी पाटीलचा कार्यक्रम असल्याचेही चर्चा आहे.  याला जिल्ह्यातील राजकीय पक्षाने पोलीस प्रशासनाला निवेदन देत गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला परवानगी देऊ नये अशी मागणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.

सध्या गणेशोत्सवाचा काळ सुरू असून मोठ्या प्रमाणत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. कोल्हापुरातील २२ सप्टेंबरला नंदगाव तर २४ सप्टेंबरला राशिवडे या गावात प्रसिद्ध नृत्यागंना गौतमी पाटील हिचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र या दोन्ही कार्यक्रमाला पोलीस अधीक्षकांनी आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मनोरंजन विभागांनं परवानगी नाकारली असून यामुळे आयोजकांनी हा कार्यक्रम रद्द केला आहे.  सध्या गणेशोत्सव सुरू असून हा सण शांततेत पार पडावा यासाठी संपूर्ण पोलीस दल रस्त्यावर आहे. ज्यांच्या कार्यक्रमाला नागरिकांची गर्दी होते अशा कार्यक्रमांना पोलिसांना पाचारण करावा लागतं आणि आताच्या स्थितीला पोलिसांना तैनात करणे अशक्य असल्याने आम्ही ही परवानगी नाकारली असल्याचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी म्हटले आहे.

गौतमी पाटील यांचा कार्यक्रम म्हटला की गोंधळ हा आलाच...या आधी देखील नांदेड, नाशिक, सातारा, परभणी येथे कार्यक्रमात अतिउत्साही चाहत्यांनी केलेल्या हुल्लडबाजीमुळे गौतमी पाटील हिच्या कार्यक्रमाला गालबोट लागल्याचे समोर आले आहे. कोल्हापूर जिल्हा जवळ असलेल्या सीमा भागात देखील कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र येथे देखील हुल्लडबाजी केल्याने कार्यक्रम थांबवण्याची वेळ आयोजकांवर आली होती. याशिवाय तिच्यावर अनेकवेळा टीका ही झाली. तर आता या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांनी जिल्ह्यात गौतमी पाटीलच्या यांच्या कार्यक्रमांना परवानगी नाकारली आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातही   गौतमी पाटील च्या कार्यक्रमा संदर्भात पोलीस प्रशासन काय भूमिका घेतो याकडे आता लक्ष लागून राहिली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026