LIVE UPDATES

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे 19 ऑक्टोबरला कोकणात !

Edited by: विनायक गावस
Published on: October 10, 2023 11:22 AM
views 606  views

सावंतवाडी : आगामी निवडणुका जिंकण्यासाठी विधानसभा मतदारसंघात १०८ ते ११० सुपर वॉरियर्स नियुक्त करण्यात आली असून महाविकास संकल्प २०२४ साठी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे कोकण दौऱ्यावर येत आहेत. १९ ऑक्टोबरला ते कणकवली येथे कार्यकर्त्यांची संवाद साधतील अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर यांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षाच्या कार्यकाळातील विविध योजना विकासकामे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यातील कामगिरी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरिता भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे हे १७ ऑक्टोबर पासून कोकण दौऱ्यावर येत आहेत. ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघासाठी १९ ऑक्टोबरला सायंकाळी तीन वाजता कणकवली येथे कार्यकर्त्यांची संवाद साधतील, महाविकास संकल्प 2024 या अभियानात प्रत्येक घरोघर वॉरियर्स जाऊन मातीचा कलशामध्ये तीनशे आठ ठिकाणाहून माती गोळा करून कणकवलीत जमा करून ती दिल्ली येथील पाठवण्यात येणार आहे. दिल्ली या ठिकाणी शहिदांच्या स्मारकातील अमृतवाटिकेला ही माती प्रदान केली जाणार असल्याचे अतुल काळसेकर यांनी सांगितले.

तर येथील ताज हॉटेलच्या जमिनीबाबत राजन तेली यांनी  उत्तर देताना सांगितले की, वेळागरवासीयांची भूमिका समजावून घेऊन निर्णय घेण्यात यावा, गेली ३२ वर्षे हे जमीन मालक न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत. काम कोणी केले याला आपला विरोध नसल्याचे ते म्हणाले.यावेळी जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, जिल्हा सरचिटणीस महेश सारंग,एकनाथ नाडकर्णी, माजी नगराध्यक्ष संजू परब, राजन म्हापसेकर, श्वेता कोरगावकर, रवींद्र मडगावकर,महेश धुरी प्रथमेश तेली अजय गोंदावळे दिलीप भालेकर प्रमोद कामत आदी उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026