LIVE UPDATES

राष्ट्रवादीचा 13 ऑक्टोबरला मेळावा !

पक्ष प्रभारी बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती
Edited by: संदीप देसाई
Published on: October 12, 2023 13:22 PM
views 614  views

दोडामार्ग : "शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवणाऱ्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांचा हा मेळावा असून या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सिंधुदुर्ग कोकण विभागीय अध्यक्षा अर्चना घारे परब यांनी केले आहे.

  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा येत्या 13 ऑक्टोबर रोजी सावंतवाडी येथे पक्ष प्रभारी माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे. सावंतवाडीतील रवींद्र मंगल कार्यालयात 11 वाजता हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यासाठी जेष्ठ नेते सुरेशभाई दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली दोडामार्ग तालुका नियोजनाची आढावा बैठक दोडामार्ग तालुक्यात नुकतीच संपन्न झाली.

     सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे वतीने होणाऱ्या बैठकीमध्ये सावंतवाडी तालुक्यातील जास्तीत जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्यासाठी नियोजन यावेळी करण्यात आले. 

  या नियोजन बैठकीसाठी जेष्ठ नेते सुरेश दळवी, जिल्हा उपाध्यक्ष संदीप गवस, तालुकाध्यक्ष प्रदीप चांदेलकर, शहराध्यक्ष सुदेश तुळसकर, युवक अध्यक्ष गौतम महाले, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष उल्हास नाईक, सावंतवाडी तालुका युवक उपाध्यक्ष विवेक गवस, विलास सावळ आदी पदाधिकारी उपस्थित होते.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026