LIVE UPDATES

ऑनलाईन आंतरराष्ट्रीय एकपात्री अभिनय स्पर्धा

मराठी रंगभूमीदिनानिमित्त SK प्रोडक्शनचं आयोजन
Edited by: जुईली पांगम
Published on: October 16, 2023 21:46 PM
views 1024  views

कुडाळ : मराठी रंगभूमीने आजवर रसिक प्रेक्षकांचे मनोरंजन केले पण त्याच ताकदीने प्रबोधन देखील केले आहे. कालानुरूप बदल आत्मसात करून या रंगभूमीने आपले नावीन्य जपले आहे. बदलत्या काळानुसार नाट्यगृहात होणारी नाटके आता आपल्याला youtubeच्या माध्यमातून घरबसल्या जगभरात कुठेही पहायला मिळतात. या बदलामुळे नाट्य रसिकांची सेवा मराठी रंगभूमी अखंडितपणे करत आहे. ५ नोव्हेंबरला मराठी रंगभूमी दिवस साजरा केला जातो याचेच औचित्य साधून SK production house kudal  ऑनलाईन आंतरराष्ट्रीय  एकपात्री अभिनय स्पर्धा हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू करत आहे. 

या आहेत अटी - नियम 


या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आपल्याला खालील नियमांचे पालन करणे बंधनकारक असणार आहे. ही संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन स्वरूपात पार पडले. जगभरातील कोणताही स्पर्धक या स्पर्धेत भाग घेऊ शकतो.या स्पर्धेत प्रवेशमूल्य १०० रुपये असणार आहे . स्पर्धकाचे वय हे कमीतकमी १५ वर्षे असणे आवश्यक आहे. स्पर्धकाने पाठवलेला व्हिडीओ हा मराठी किंवा बोलीभाषेत असावा. व्हिडीओची मर्यादा कमीतकमी ५ मिनिटे व जास्तीत जास्त ६ मिनिटे असावी. व्हिडीओ कोणत्याही प्रकारे एडिट केलेला नसावा. व्हिडीओ हा लँडस्केप मोड मधे करावा वीडियो करण्यासाठी एकच मोबाईल कॅमेरा वापरावा. व्हिडीओ शूट करतेवेळी पार्श्वसंगीत वापरले असेल तर चालू शकेल. प्रकाशयोजना व पार्श्वसंगीत यांचा समावेश मूल्यांकनात केला जाणार नाही. विजेता हा परिक्षकांचे मूल्यांकन यावर ठरवला जाईल.

 व्हिडीओ डॉक्यूमेंट पध्दतीने,  व्हॉट्सऍप ( 99755 52412) ,  मेल (skproductionhousekudal@gmail.com) किंवा ड्राईव्हला पाठवणे बंधनकारक आहे. व्हिडीओ पाठवण्याची अंतिम तारिख ही ३० ऑक्टोबर २०२३ असणार आहे. ३१ ऑक्टोबर २०२३ रोजी सर्व व्हिडिओ एकाच दिवशी Unseen Konkan या यूट्यूब चॅनल ला पोस्ट केले जातील . या स्पर्धेचा निकाल ५ नोव्हेंबर २०२३ रोजी Unseen Konkan या इंस्टाग्राम पेज वरून संध्याकाळी ५ वाजता  लाईव्ह सांगितला जाईल.

या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विजयी होणाऱ्या स्पर्धकांना आकर्षक बक्षिसे आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तरी जास्तीतजास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन sk production house चे संस्थापक  सचिन कोंडस्कर यांनी केलंय


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026