LIVE UPDATES

1 नोव्हेंबरला मंत्रालयावर मोर्चा

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्गचा इशारा
Edited by: प्रसाद पाताडे
Published on: October 18, 2023 18:41 PM
views 670  views

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महावितरण कंपनीमध्ये ५६० कंत्राटी कर्मचारी सद्यस्थित कार्यरत आहेत, हे कर्मचारी कायम कामगारांच्या रिक्त पदावर कंत्राटी म्हणून वायरमन, क्लार्क शिपाई ड्रायव्हर म्हणून तुटपुंजा मानधनावर कार्यरत आहेत. या मानधनात त्यांच्या कुटूंबीयांच्या जीवनावश्यक गरजा पूर्ण होत नाहीत यासाठी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाने केलेल्या विविध मागण्या शासनाकडे व प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. त्यातच कंत्राटदार कामगारांचे आर्थिक शोषण करत आहेत. प्रशासन त्यांच्यावर काही कारवाई करत नाही यामुळे कामगारांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यामुळे १ नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर काढण्यात येणाऱ्या मोर्चामध्ये महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्गच्यावतीने तीनशेच्याहून अधिक कंत्राटी कर्मचारी मुंबई येथे १ नोव्हेंबर रोजी  काढण्यात येणाऱ्या मोर्चात सहभागी होणार आहेत निवेदन महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना दिले आहे.

महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ सिंधुदुर्गच्या वतीने जिल्हाअधिकारी किशोर तावडे यांना आंदोलन निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा अध्यक्ष आनंद लाड दिनेश राऊळ, विराज गावडे, राकेश हुमरमळेकर, अक्षय परब , संभाजी तावडे, मारुती मेस्त्री, राजू घाडी उपस्थित होते.

जिल्ह्यात एक नोव्हेंबर रोजी वीज ग्राहकांच्या लाईटची गैरसोय झाल्यास व याचा नाहक त्रास जिल्हा वासियांना झाल्यास जिल्हा वासियांना समजून घेत सहकार्य करावे असे आवाहन महाराष्ट्र बीज कामगार संघाचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी केला आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026