LIVE UPDATES

पदवीधर गटाच्या मतदार नोंदणी प्रक्रियेची ‘एसआयटी’चौकशी करण्याची मागणी

Edited by:
Published on: November 05, 2023 17:16 PM
views 583  views

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या नोंदणीकृत पदवीधर गटाची अधिसभा निवडणूक एप्रिलअखेरीस होणार आहे. या निवडणुकीसाठी पुन्हा नव्याने मतदार नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये विविध विद्यार्थी संघटना सक्रियपणे सहभागी झाल्या आहेत, परंतु याआधी झालेल्या मतदार नोंदणी प्रक्रियेत मोठय़ा प्रमाणात गैरवापर झाला असून विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी शिंदे गटाच्या विधान परिषद आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून केली आहे.

 काही ठरावीक आयपी अ‍ॅड्रेसवरूनच मोठय़ा प्रमाणावर मतदार नोंदणी करण्यात आली आहे. तसेच काही ठरावीक बँक खात्यामधून मतदार नोंदणी शुल्क भरण्यात आले आहे. मतदारांचा मोबाइल क्रमांक आणि ई-मेल आयडीसुद्धा वगळण्यात आला आहे. तसेच सुरुवातीला असलेली ओटीपी पद्धतही बंद करण्यात आली. हे सर्व गैरप्रकार एका विशिष्ट संघटनेला फायदा होण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप डॉ. मनीषा कायंदे यांनी पत्रात केला आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026