LIVE UPDATES

गोव्यात आजपासून ‘फिल्मोत्सव’ !

ब्रिटनच्या ‘कॅचिंग डस्ट’ चित्रपटाने उघडणार ‘इफ्फी’चा पडदा
Edited by: ब्युरो
Published on: November 20, 2023 12:05 PM
views 634  views

पणजी : राज्यात कायमचा मुक्काम असलेल्या ५४व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला (इफ्फी)  सोमवारपासून प्रारंभ होत आहे. त्यासाठी देश-विदेशांतील हजारो चित्रपटप्रेमी राजधानी पणजीत दाखल झाले आहेत. ब्रिटनच्या ‘कॅचिंग डस्ट’ या चित्रपटाने इफ्फीचा पडदा उघडणार आहे.        

महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याला अभिनेत्री माधुरी दीक्षितसह अभिनेता शाहीद कपूर, अभिनेत्री श्रेया सरन यांच्यासह अन्य बॉलीवूड कलाकार उपस्थित राहणार आहेत. यंदाच्या उद्घाटन सोहळ्यात करमणुकीच्या कार्यक्रमांवर अधिक भर देण्यात येणार आहे.  या सोहळ्याचं थेट प्रक्षेपण कोकणसाद LIVE च्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर LIVE पाहता येणार आहे.       

या दिग्गज कलाकारांची मांदियाळी 

महोत्सवात होणाऱ्या विविध मास्टर क्लास व इन कॉन्व्हर्सेशनमध्ये विद्या बालन, राणी मुखर्जी, सारा अली खान, मनोज वाजपेयी, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्दिकी असे बॉलिवूडचे दिग्गज कलाकार येणार आहेत. याशिवाय सनी देओल, मधुर भांडारकर, के. के. मेनन, विजय सेतुपती, बोनी कपूर, गुलशन ग्रोवर, करण जोहर, अल्लू अर्जुन, कार्तिकी गोन्साल्वीस यांच्यासह मायकल डग्लस, ब्रिलांटे मेंडोझा, ब्रेंडन गाल्विन हे विदेशी कलाकारही उपस्थित राहणार आहेत. 

यंदाही मिरामार, रवींद्र भवन मडगाव आणि हणजूण येथे ओपन एअर स्क्रीनिंग दाखवण्यात येणार आहे. दरम्यान, महोत्सवासाठी देश-विदेशातील सुमारे सात हजार प्रतिनिधींनी नोंदणी केलेली आहे.       

महात्सवाचे उद्घाटन आणि समारोप सोहळा ताळगाव येथील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमवर होणार आहे. या व्यतिरिक्त आयनॉक्स, मॅकेनीझ पॅलेस आणि पर्वरी येथील आयनॉक्समध्ये चित्रपट दाखवण्यात येणार आहे. या शिवाय कला अकादमीत मास्टरक्लास होणार आहे, तर  मिरामार समुद्रकिनारी, हणजूण येथे समुद्रकिनारी व मडगावच्या रवींद्र भवन येथे खुला पडदा लावण्यात येणार आहे. भगवान महावीर बालोद्यान तसेच कला उद्यान येथे मनोरंजन झोन करण्यात आला आहे. या ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत.

सुरक्षा तसेच आपत्कालीन सेवेसाठी गोवा पोलीस, अग्निशामक दल आणि १०८ जीव्हीके इएमआरआय रुग्णवाहिका व इतर यंत्रणा सज्ज झाली आहे.

अग्निशामक दलही सज्ज

या महोत्सवात अग्निशामक दलाने ताळगाव येथील डाॅ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियमसह महोत्सवाच्या इतर ठिकाणी  सुमारे ८० कर्मचारी तैनात केले आहे. या महोत्सवाच्या उद्घाटन आणि समारोप ठिकाणी २० कर्मचारी, पूर्णवेळ तीन, तर उद्घाटन आणि समारोप दिवशी अतिरिक्त दोन असे सात  १२ हजार लिटर बंब आणि सुमारे ५० अग्निरोधक साहित्य (फायर एक्सटिंग्युअर) ठिकाणी ठेवले आहे.       

या व्यतिरिक्त आयनाॅक्स, मॅकेनीझ पॅलेस, पर्वरी येथील आयनाॅक्स तसेच इतर महोत्सवाच्या ठिकाणी मिळून सात ठिकाणी बंब, जलद प्रतिसाद वाहन (क्युवआरव्ही) आणि दोन मोटरसायकल प्रतिसाद युनिट (एमआरयू) ठेवली आहे. या महोत्सवात वैद्यकीय यंत्रणेसाठी १०८ जीव्हीके इएमआरआयचे कर्मचारी तैनात केले आहे.

या व्यतिरिक्त संपूर्ण महोत्सवाच्या ठिकाणी रुग्णवाहिका तसेच दुचाकी रुग्णवाहिका तैनात करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त आपत्कालीन वेळी आवश्यक भासल्यास इतर यंत्रणेचा वापर करण्यात येणार आहे.                         

पोलिसांच्या सुरक्षेचे कडे

सुरक्षेसाठी गोवा पोलिसांनी दोन अधीक्षक, सात उपअधीक्षक, १८ निरीक्षक, ४६ उपनिरीक्षक, ७ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, ५१ हवालदार, ४५८ पोलिस कॉन्स्टेबल, ६८ महिला पोलिस काॅन्स्टेबल मिळून  पोलिस कर्मचारी एका स्फिटला ६६४ तैनात केले आहे. यात भारतीय रिझर्व बटालियनचे (आयआरबी) एक पोलीस निरीक्षक, तीन पोलीस उपनिरीक्षकासह ४३ पुरुष आणि २२ महिला कर्मचाऱ्याची मिळून तीन प्लॅटून तैनात केले आहे. तसेच गोवा पोलिसांचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस), बाॅम्ब निकामी पथक (बीडीएस), जलद कृती दलाचे पोलीस, वाहतूक विभागाचे पोलीस  तसेच विशेष विभागाचे पोलिस  व इतर कर्मचाऱ्यांची सुरक्षा यंत्रणेसाठी तैनात करण्यात आले आहे.




ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026