LIVE UPDATES

आदित्य ठाकरे उद्या कोकणात

असा आहे दौरा
Edited by: विनायक गावस
Published on: November 22, 2023 20:20 PM
views 599  views

सिंधुदुर्ग : शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख, माजी मंत्री आदित्य ठाकरे उद्या सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येणार आहेत. २३ आणि २४ असा दोन दिवस हा दौरा आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांकडे 'खळा बैठका' होणार आहेत.


त्यांचा हा दौरा राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा आहे.आदित्य ठाकरे २३ नोव्हेंबरला सकारी ११ वाजता लीना कुबल याच्या अंगणात बैठक होणार आहे. १२.२५ ला सावंतवाडी येथे चंद्रकांत कासार यांच्या घरी बैठक होणार आहे. तर कुडाळ येथे दिड वाजता मंदार शिरसाट यांच्या घरी बैठक होणार आहे. त्यानंतर बांबार्डे, कणकवली, देवगड येथे दुपारी ३ वाजेपर्यंत अशा प्रकारे बैठका होणार आहेत. सतिश सावंत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद होणार आहे.  त्यानंतर दुपारी ४ वाजता ते राजापूरला प्रयाण करणार आहेत.५ ते रात्री ८ पर्यंत त्यांच्या करबुडे येथे वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होणार आहेत. २४ ला दुपारी सव्वा बारा वाजता जिल्हाप्रमुख सचिन कदम यांची भेट ते घेणार आहेत. त्यानंतर साडेबाराला आमदार भास्कर जाधव यांच्या घरी, १.५५ मिनिटांनी माजी आमदार संजय कदम यांच्या घरी बैठक होणार आहे. दुपारी अडीचच्या सुमारास ते महाडला रवाना होणार आहे.


या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंवर सडकून टीका केली आहे. त्याचा तशाच पद्धतीने खासदार विनायक राऊत यांनी समाचार घेतला आहे. त्यामुळे ठाकरे आणि राणे यांच्यातील द्वंद्व पुन्हा पेटण्याची शक्यता आहे. राणेंच्या टिकेला ठाकरी शैलीत आदित्य ठाकरे कशापद्धतीन उत्तर देणार ? याकडे राजकीय वर्तुळाच लक्ष लागून राहिले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026