LIVE UPDATES

कोकणसाद LIVE IMPACT !

उपजिल्हा रुग्णालयाच्या दुरवस्थेबाबत मंत्री केसरकर यांची आरोग्यमंत्र्यांसोबत बैठक
Edited by: विनायक गावस
Published on: December 12, 2023 20:47 PM
views 534  views

सावंतवाडी : उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग येथील रुग्णालयांच्या समस्यांबाबत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांच्यासमवेत शालेय शिक्षणमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांची विधानभवन नागपूर येथे बैठक पार पडली. यावेळी आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. कोकणसह सिंधुदुर्गच्या आरोग्याविषयी कोकणसादनं आवाज उठवला होता. याची दखल लोकप्रतिनिधींनी घेतली होती. आरोग्याची ही समस्या आरोग्य मंत्र्यांसोबत बैठक घेत दुर करू असा शब्द दिला होता.  


आरोग्यमंत्री तानाजी सावंत व शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या या बैठकीत तिन्ही तालुक्यातील उपजिल्हा व ग्रामीण रूग्णालयातील रिक्तपद भरण्यासाठी प्रामुख्याने चर्चा झाली. विशेष तज्ञांची पद देखील भरली जाणार आहेत. तर  सावंतवाडीतील भुलतज्ञांचे थकीत मानधन अदा केल जाणार आहे. तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांच मानधन देखील डिसेंबर अखेरपर्यंत काढलं जाणार आहे. डॉक्टरांना क्वार्टर्स बांधून देण्यासाठीची चर्चा देखील या बैठकीत झाली. तर वेंगुर्ला, दोडामार्गात शवविच्छेदन गृहासाठी प्रस्ताव करण्याची सुचना केली. तिन्ही तालुक्यातील रूग्णालयातील समस्या कायमस्वरूपी दुर करण्यासाठी या बैठकीत चर्चा झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026