LIVE UPDATES

कणकवली, देवगड, वैभववाडीतील अधीक्षक -तज्ज्ञ डॉक्टरांची पदे तातडीनं भरणार

आरोग्यमंत्री डॉ. सावंत यांचा आ.नितेश राणेंना शब्द
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 13, 2023 15:51 PM
views 847  views

नागपूर : कणकवली उपजिल्हा रुग्णालय आणि  देवगड व वैभववाडी येथील ग्रामीण रुग्णालयात अधीक्षक आणि तज्ज्ञ डॉक्टरांची पदे लवकरच भरली जातील. मेडिकल ऑफिसर तांत्रिक आणि अ तांत्रिक कर्मचारी  महिना - दीड महिन्यात नियुक्त केले जातील. काही डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांची नव्याने भरती केली जाईल.तर काही पदे बदली प्रक्रियेतून भरली जातील. कणकवली विधानसभा मतदारसंघात आरोग्याच्या संदर्भात कोणत्याच तक्रारी येणार नाहीत अशा पद्धतीची सेवा आपण देऊ असे आश्वासन राज्याचे आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी आरोग्य विभागाच्या बैठकीत आमदार नितेश राणे यांना दिले. कणकवली मतदार संघातील कणकवली ,देवगड, वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील आरोग्यसेवा दर्जेदार करण्यासाठी आणि रिक्तपदे भरण्या संदर्भात भाजप आमदार नितेश राणे यांच्या आग्रहास्तव नागपूर विधान भवनात बैठक झाली. यावेळी त्यांनी हा शब्द आ. राणेंना दिला.

यावेळी सार्वजनिक आरोग्य विभागाचे मुख्य सचिव डॉ. म्हैसकर, कमिशनर डॉ. धीरज कुमार, डायरेक्टर डॉ. कंदेवाड, डेप्युटी डायरेक्ट डॉ.दिलीप माने, सिंधुदुर्ग जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर श्रीपाद पाटील व या विषयाशी संबंधित इतर अधिकारी उपस्थित होते.

कणकवली उपजिल्हा रुग्णालय येथे अधीक्षक आणि तज्ञ डॉक्टर यांच्या नियुक्ती तातडीने केल्या जातील, त्याचप्रमाणे देवगड ग्रामीण रुग्णालयात सुद्धा रिक्त असलेली पदे भरली जातील. वैभववाडी ग्रामीण रुग्णालयाची ही सर्व पदे भरली जातील त्यातील काही पदेही या महिन्यातच पूर्ण केली जातील तर काही बदल्या प्रक्रियेतून येत्या दोन महिन्यात रिक्त जागी नवीन अधिकारी आणि डॉक्टर नियुक्त केले जातील. डॉक्टर नसल्यामुळे आरोग्य सेवेचा जो खोळंबा होत आहे तो होणार नाही आणि चांगली सेवा प्रत्येक रुग्णाला मिळेल, अशा पद्धतीची व्यवस्था या प्रत्येक रुग्णालयात करून देण्याचे विश्वास आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी आमदार नितेश राणे यांना या बैठकीत दिले.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026