LIVE UPDATES

मनोज जरांगेंच्या आरोपांवर भुजबळांची प्रतिक्रिया

Edited by:
Published on: December 14, 2023 12:34 PM
views 510  views

कुणबी नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना सरकाकडून कुणबी प्रमाणपत्र दिलं जात आहे. या मराठा कुटुंबांचा कुणबी म्हणून ओबीसी आरक्षणात समावेश होणार आहे. त्याला राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विरोध केला आहे. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळ यांच्यात संघर्ष चालू आहे. दोन्ही नेते एकमेकांवर आरोप - प्रत्यारोप करत आहेत. मराठा आंदोलनादरम्यान, बीडमध्ये जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. याप्रकरणी भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर आरोप केले होते. त्यावर उत्तर देताना जरांगे पाटील म्हणाले, बीडमधली दंगल ही भुजबळांनीच घडवून आणली होती. त्यावर आता भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

भुजबळ म्हणाले, हे अत्यंत बालिश असे आरोप आहेत. मी बीडला जाऊन इतकी मोठी दंगल करू शकतो का? मुळात मी असं करण्यामागचं कारण काय? तसेच या दंगलप्रकरणी पकडली गेलेली पिस्तुलधारी माणसं मनोज जरांगे यांची आहेत. २४ तास जरांगेंबरोबर राहणारी माणसं बीडच्या जाळपोळप्रकरणी पोलिसांनी पकडली आहेत.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026