LIVE UPDATES

अफजलखानाच्या कबरीजवळील अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरुवात

चार जिल्ह्यातील 1800 हून अधिक पोलीस कारवाईत सहभागी
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 10, 2022 11:16 AM
views 575  views

सातारा : साताऱ्यातील किल्ले प्रतापगड (ता. महाबळेश्वर) येथील अफजलखान कबरीजवळील अनधिकृत बांधकाम पोलीस बंदोबस्तात हटवण्यास आज पहाटेपासून सुरवात करण्यात आली. यासाठी सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली ग्रामीण या चार जिल्ह्यातील १८०० हून अधिक पोलीस वाई येथील पोलीस उपविभागीय कार्यालयात बुधवारी रात्रीपासून दाखल झाले होते. पहाटे ही सर्व यंत्रणा प्रतापगडावर दाखल झाली. सकाळी सहा वाजल्यापासून अनधिकृत बांधकाम हटवण्यास सुरवात झाली.


प्रतापगड, महाबळेश्वर,वाई, कराड, सातारा येथेही मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या परिसरात जमावबंदीचे १४४ कलम लागू करण्यात आले आहे. साताऱ्याचे जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, पोलीस उपअधीक्षक डॉ शीतल जानवे खराडे, महाबळेश्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील चौधरी आदी वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. माध्यम प्रतिनिधींना परीसरात जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.


अफजलखानाच्या कबरी शेजारी उदात्तीकरण करण्यासाठी वनविभागाच्या हद्दीत अनेक खोल्यांचे अनधिकृत बांधकाम करण्यात आले आहे. ते पाडून टाकण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनांनी केली होती.न्यायालयानेही हे बांधकाम पाडण्याचे आदेश दिले होते. त्याप्रमाणे सातारा प्रशासनाने हे बांधकाम हटवण्याची कारवाई आज पहाटेपासून सुरु केली आहे.


सातारा जिल्ह्यातील प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखानाच्या कबरीशेजारी अलीकडच्या काही वर्षात उदात्तीकरण करण्यात येत होते. तेथे उरूसही भरविण्यास सुरवात झाली होती. तेथील उदात्तीकरण रोखण्याची मागणी करण्यात आली होती. सध्या या परिसरात जाण्यास सामान्यांना बंदी घालण्यात आली होती.


आज पहाटे तारखेप्रमाणे आलेल्या शिवप्रतापदिनीच राज्य सरकारकडून यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजलखान कबरीलगतचे अतिक्रमण हटविण्याचे काम सुरू झाले आहे.



ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026