LIVE UPDATES

नाट्य रसिकांसाठी महापर्वणी !

कणकवलीत 'नाथ पै एकांकिका स्पर्धा' !
Edited by: उमेश बुचडे
Published on: December 19, 2023 12:19 PM
views 544  views

कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने ४६ वी राज्यस्तरीय बॅ. नाथ पै 'एकांकिका स्पर्धा २०२३' चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेला २४ डिसेंबर पासून संस्थेच्या नाट्यगृहात प्रारंभ होणार आहे. या एकांकिका स्पर्धेच्या निमित्ताने नाट्य रसिकांसाठी महापर्वणीच उपलब्ध झाली आहे. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ २४ डिसेंबर रोजी रात्री ८.३० वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत होईल.  त्यानंतर शालेय गटातील एकांकिका स्पर्धेला प्रारंभ होईल.  

रात्री ९ वाजता आरती प्रभू कला अकादमी, कुडाळ  यांची 'घुसमट' लेखन मेधा मराठे, रात्री १० वाजता कुडाळ हायस्कूल कला विभाग कुडाळ यांची  'देवाची फुले' लेखन सई परांजपे, रात्री ११ वाजता शिरगाव हायस्कूलची 'आभाळ' लेखन डॉ. राजेंद्र चव्हाण, रात्री १२ वाजता शिंदे अकॅडमी, कोल्हापूरची 'अस्तित्व' लेखन गोविंद गोडबोले. तर २५ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता बाबा वर्दम थिएटर्स कुडाळ यांची 'पुतळे झाली माणसे'  लेखन मेधा मराठे, रात्री १०वाजता विद्यामंदिर हायस्कूल, कणकवलीची 'आऊट ऑफ कंट्रोल' लेखन मनोज मेस्त्री या एकांकिका होतील.

त्यानंतर खुल्या गटामधील एकांकिका होतील. त्यामध्ये रात्री ११ वाजता क्रिएटिव्ह कार्टी, मुंबई, 'इंटरोगेशन' लेखन चैतन्य सरदेशपांडे, रात्री १२ वाजता डी. बी. जे. महाविद्यालय, चिपळूण यांची 'हॅप्पी फादर्स डे ' लेखन संकेत हळदे, रात्री १ वाजता कलासक्त, मुंबई यांची  'संपर्क क्रमांक' लेखन संदेश जाधव. २६ डिसेंबर रोजी रात्री ९ वाजता खुल्या गटातील नटरागिणी कलामंच, मालवण यांची 'शोक पर्व' लेखन प्रमोद काळे, रात्री १० वाजता एस.पी. कॉलेज ऑफ अॅग्रीकल्चर, चिपळूण यांची  'कॅलिडोस्कोप' लेखन ऋषीकेश तुराई, रात्री ११वाजता फोर्थ वॉल थिएटर डिचोली, गोवा यांची 'अमर अमृता' लेखन विजयकुमार नाईक, रात्री १२ वाजता महावीर महाविद्यालय, कोल्हापूर यांची 'निर्झर' लेखन भारत जीवन, चारुदत्त प्रभूखोत, रात्री १ वाजता कलांगण, मालवणची 'होय म्हाराजा' लेखन किरण करवडकर, २७ डिसेंबर  रोजी रात्री ९ वाजता बाबा वर्दम थिएटर्स, कुडाळ यांची 'कुकुचकू' लेखन मेधा मराठे, रात्री १० वाजता मराठवाडा मित्र मंडळ, वाणिज्य महाविद्यालय पुणे यांची 'सिनेमा' लेखन मंदार इंगळे-श्रेयश जोशी, रात्री ११ वाजता  गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर यांची 'बिईंग अँड नथींग' लेखन ऐश्वर्या पाटील, रात्री १२ वाजता ढ मंडळी, कुडाळ यांची 'डीम टँग डिटँग' कथा रत्नाकर मतकरी, नाट्य रुपांतर विठ्ठल तळवलकर यांनी केले आहे. एकांकिका झाल्यानंतर रात्री १ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण समारंभ होईल. या सर्व एकांकिकांचा लाभ नाट्य रसिकांनी घ्यावा असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड.नारायण देसाई,कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026