LIVE UPDATES

'आला बैलगाडा' ; शिंदेच 'आदर्श' गायन

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 19, 2023 16:46 PM
views 955  views

मुंबई : सध्या अनेक बॉलिवूड आणि मराठी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. एकीकडे बॉलिवूडचा एनिमल हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे तर दुसरीकडे मराठी झिम्मा २ हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर थांबायचं नाव घेत नाही आहे. अनेक मराठी हिंदी सिनेमा हिट होत असतानाच नुकतंच रिलीज झालेलं  'आला बैलगाडा'  हे गाणं आकर्षणाचा विषय ठरत आहे. हे गाणं सध्या खूपच चर्चेत आहे.


'बैलगाडा शर्यत' ही महाराष्ट्रातील ४०० वर्षांची परंपरा आहे. शेतकरी आणि बैलाच सुंदर नात दर्शवणारं बिग हिट मीडिया प्रस्तुत आणि प्रशांत नाकती म्युझिकल  'आला बैलगाडा' गाण सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हे गाण सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि ट्रेंडिंग गायिका सोनाली सोनावणे यांनी गायल आहे. तर प्रशांत नाकती आणि संकेत गुरव यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. या गाण्यात वैष्णवी पाटील, विशाल फाले, निक शिंदे आणि रितेश कांबळे या कलाकारांनी दमदार अभिनय केला आहे. 'हृतिक अनिल मनी' आणि 'अनुष्का अविनाश सोलवट' यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.

महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये बैलगाडा हे अर्थार्जनाचं एक मोठं माध्यम आहे. अनेक भागांमध्ये 'बैलगाडा' शर्यतींचं आयोजन केलं जातं. याच खेळाचा थरार आता प्रेक्षकांना एका गाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला आहे. नुकतंच हे मराठमोळं रांगडं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या आवाजातील 'आला बैलगाडा' हे गाणं बघून महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या गाण्याचं कौतुक केलं आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गाण्याविषयी म्हणाले, ''अतिशय उत्तम गाणं झालं आहे. संगीतकार प्रशांत नाकती  यांच्या सह विशाल फाले, वैष्णवी पाटिल, निक शिंदे आणि रितेश कांबळे या नवख्या कलाकारांनी अतिशय सुंदर काम केले आहे. गाण्याचे निर्माते ऋतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी गाणं केल्याबद्दल त्यांचे खूप कौतुक. यापुढील गाणी वेगवेगळ्या प्रकारची नव्या पिढीला भावतील आवडतील अशी करावी. या गाण्याच्या निर्मिती केलेल्या बिग हीट मीडियाच्या सर्व  टीमला माझ्याकडून शुभेच्या.'' 'आला बैलगाडा' हे गाण सुप्रसिद्ध गायक आदर्श शिंदे आणि सुमधूर गळ्याची गायिका सोनाली सोनावणे यांनी गायले आहे. तर, मिलिनिअर संगीतकार प्रशांत नाकती याने या गाण्याला संगीत दिले आहे. हृतिक अनिल मनी आणि अनुष्का अविनाश सोलवट यांनी या गाण्याची निर्मिती केली आहे.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Hanuman Ansh Box Office Collection : २ कोटींच्या बजेटमध्ये बनलेला ‘हनुमान अंश’ बॉक्स ऑफिसवर सुपरहिट
September 21, 2026
Watch This Week : क्राइम थ्रिलर ते रोमान्स, या आठवड्यात पहा 'या' बेस्ट वेब सिरिज अन् चित्रपट
September 12, 2026
Yash Toxic Movie : केजीएफ स्टार यशच्या 'टॉक्सिक' सिनेमाचा रिलिजआधीच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ
August 25, 2026
Khatron Ke Khiladi Season 15 : 'खतरो के खिलाडी'च्या १५ व्या सीझनमधून गौरव खन्ना 'एलिमिनेट'
August 24, 2026