LIVE UPDATES

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवट !

Edited by: ब्युरो न्यूज
Published on: December 20, 2023 15:22 PM
views 488  views

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज अखेरच्या दिवशी तब्बल 37 लक्षवेधी मांडल्या जाणार आहेत. तसंच आज दोन्ही सभागृहात विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री आज उत्तर देतील. सत्ताधारी पक्षाच्या विदर्भाचा विकास या संदर्भात प्रस्ताव आहे त्यावरही मुख्यमंत्री उत्तर देतील. अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विदर्भासाठी काही विशेष पॅकेज किंवा सवलतीची घोषणा होतात का हे पाहावे लागेल. अधिवेशन संपल्यानंतर संध्याकाळी विरोधी पक्षांची पत्रकार परिषद होईल. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडेल.

अधिवेशनाचा कालावधी 2 दिवसांनी वाढवण्यात यावा, अशी विरोधकांनी मागणी केली होती. मात्र, या मागणीचा विरोध करत सरकारनं आधी ठरल्याप्रमाणं आजच अधिवेशन संपवण्याची मागणी केली आहे. विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 26 फेब्रुवारीपासून  सुरुवात होणार आहे. 26 फेब्रुवारी ते 1 मार्च असे चार दिवस हे अधिवेशन असणार आहे.. या अधिवेशनात अर्थसंकल्पासह मराठा आरक्षणाचाही निर्णय होण्याची शक्यता आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली.क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहे त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत बसवणारा आरक्षण देणार आहे. मागासवर्ग आयोगाच अहवाल एक महिन्यांत येईल. त्यानंतर फेब्रुवारी मध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन घेणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत केली. क्युरेटिव्ह याचिका हा एक आशेचा किरण आहे. ज्या त्रुटी आहेत, त्या दूर करण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण देण्यास सरकार कटिबद्द असल्याची ग्वाही एकनाथ शिंदेंनी दिलीय. मागासवर्ग आयोगाचा अहवाल एका महिन्यात येईल. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन बोलावून आम्ही आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. तर नोंदी सापडलेल्यांच्या कुटुंबीयांनाही कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026