मुंबई : राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. शिंदे गटाच्या विलिनीकरणाची भाजपकडून रणनीती आखली जात असल्याची माहिती राजकीय सूत्रांची दिली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र ठरवल्यास भाजपने हा 'प्लान बी' तयार ठेवल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी नुकतीच शिवसेनेच्या १६ आमदार अपात्र प्रकरणाची सुनावणी घेतली. यावेळी ठाकरे आणि शिंदे गटाच्या बाजूने जोरदार युक्तीवाद करण्यात आला.
दोन्ही गटाची सविस्तरपणे बाजू ऐकून घेतल्यानंतर येत्या १० जानेवारीला यासंदर्भातील निकाल देण्यात येणार आहे. मात्र, या निकालाआधीच भाजपने मोठी रणनीती आखल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिंदे गटाच्या १६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आलं किंवा शिंदे गटाचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, तर एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांच्या गटाचे आमदार हे भाजपमध्ये विलीन होतील अशी रणनीती भाजपने आखल्याचे वृत्त आहे. दुसरीकडे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाच्या बाजूने निकाल देऊन ठाकरे गटाचे आमदार अपात्र ठरवल्यास उद्धव ठाकरे गट सुप्रीम कोर्टात दाद मागू शकतो. कोर्ट यावर काय निर्णय घेईल, याकडे देखील भाजपचे लक्ष असेल.
ताजी बातमी
View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026

चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026

रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या
View all
Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026





