LIVE UPDATES

बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी

औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश
Edited by: प्रतिनिधी
Published on: November 12, 2022 12:56 PM
views 584  views

ब्युरो रिपोर्ट : योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्यात आली आहे. उत्तराखंडमधील आर्युवेद आणि युनानी परवाना प्राधिकरणाने पतंजलीच्या पाच औषधांवर बंदी घालण्याचा आदेश जारी केले आहेत. दिव्य फार्मसीमार्फत या औषधांचं उत्पादन केलं होत होतं. या औषधांचं उत्पादन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर या औषधांचं पुन्हा उत्पादन करायचं असेल तर त्यासाठी पुन्हा परवागी घेणं बंधनकारक असणार आहे.


औषधांच्या जाहिराती दिशाभूल करणाऱ्या असल्याचा ठपका ठेवत, ही कारवाई करण्यात आली आहे.मात्र हा दावा दिशाभूल करणारा असल्याचं प्राधिकरणाला आढळल्यानंतर अखेर कारवाईचा बडगा उगारण्यात आलाय. या औषधांच्या उत्पादनसोबतच या औषधांच्या जाहिराती तातडीने बंद करण्यास सांगण्यात आलं.पतंजली मार्फक मधुग्रीट, थायरोग्रीट, बीपीग्रीट यासोबत लिपिडोम टॅबलेट आणि आयग्रीट गोल्ड, टॅबलेट अशा एकूण पाच औषधांच्या उत्पादनावर बंदी घालण्यात आली आहे. बीपी, डायबेटीस याच्यासोबत हाय कोलोस्ट्रॉल यासारख्या आजारांवर ही औषधं प्रभावी असल्याचा दावा केला जात होता.

--------------------------------------


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026