LIVE UPDATES

शिंदे गटाची मोठी खेळी | शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात !

आम्ही दोघं अनेक वर्षांपासून विभक्त | आमचा काहीही संबंध नाही | पती वैजनाथ वाघमारे यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली
Edited by: ब्युरो न्यूज
Published on: November 13, 2022 13:11 PM
views 421  views

मुंबई : शिवसेनेतील आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटाच्या 'बाळासाहेबांची शिवसेना' पक्षात प्रवेश करणार असून शिंदे गटाने हा मोठा राजकीय डाव टाकला आहे. 


शिवसेनेत दोन गट पडल्यापासून राजकीय घडामोडींना अतिशय वेग आला आहे. दोन्ही गटातील नेते एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करताना दिसतात. ठाकरे गटातील प्रवक्त्या सुषमा अंधारे अनेकदा शिंदे गटातील नेत्यांवर सडकून टीका करताना दिसतात. मात्र, आता एक अतिशय मोठी बातमी समोर आली आहे. सुषमा अंधारे यांचे पतीच आता बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. आज दुपारी सुषमा अंधारे यांचे पती शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे. टेंभी नाका येथील आनंद मठात हा प्रवेश होणार आहे.


उद्धव ठाकरेंच्या पक्षाला हा पुन्हा एकदा मोठा झटका बसला आहे. अंधारे कुटुंबीयात फूट पडली आहे. शिवसेनेची तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुषमा अंधारेंचे पती एकनाथ शिंदे पक्षात प्रवेश करत आहेत. यावर सुषमा अंधारे यांचे पती वैजनाथ वाघमारे यांनी स्वतःच प्रतिक्रिया दिली आहे. 'आम्ही दोघं अनेक वर्षांपासून विभक्त राहातो. आमचा काहीही संबंध नाही. एकनाथ शिंदेंची भूमिका पटली म्हणून मी त्यांच्या पक्षात प्रवेश करत आहे. एकनाथ शिंदेंसोबत चर्चा केली आहे. त्यांच्यासमोर काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांनी हो म्हटलं आणि आज प्रवेश करत आहे' अशी माहिती वाघमारे यांनी दिली आहे. पक्ष जी जबाबदारी देईल ती आपण पार पाडेल, असंही असेही वाघमारे यांनी सांगितले आहे. 


ताजी बातमी

View all

कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
चाकरमान्यांची पावलं मुंबईकडे
September 22, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
रुळांचा विस्तार की इमारतीचे बांधकाम ?
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..
September 11, 2026