मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे दिग्गज नेते अशोक चव्हाण भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनामापत्रात माजी विधानसभा सदस्य असा उल्लेख आहे. माजी शब्द हातानं लिहिण्यात आलेला आहे. पत्रातील बाकीचा मजकूर छापील आहे. चव्हाण यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी स्वीकारलेला आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण लवकरच भाजप प्रवेश करतील अशी चर्चा आहे. चव्हाण यांचं वर्चस्व आणि वजन पाहता त्यांच्या पक्ष प्रवेशाला भाजपचे वरिष्ठ नेते उपस्थित राहू शकतात. काँग्रेसचे आणखी काही आमदारही चव्हाण यांच्या पाठोपाठ राजीनामा देऊ शकतात. तशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
ताजी बातमी
View all








