LIVE UPDATES

प्रतिबंधित गुटखा विक्रेत्यांना पुरविल्या प्रकरणी आरोपीला जामीन मंजूर

Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 22, 2026 07:21 PM
views 128  views

कणकवली : शासनाने प्रतिबंधीत केलेला ३ लाख ८१ हजार २१६ रुपयांचा गुटखा व तंबाखुजन्य पदार्थ बेळगांव ते वेंगुर्ले अशी वाहतूक करून विक्रेत्यांना पुरविल्याप्रकरणी अटकेत असलेला ट्रान्सपोर्ट व्यावसायिक संशयित मोहन निलेश परब (रा. वेंगुर्ले कॅम्प भटवाडी) याला अतिरीक्त सत्र न्यायाधिश एस. एस. इंदलकर यांनी ५० हजार रुपयांचा सशर्थ जामीन मंजूर केला. आरोपीच्यावतीने ॲड. उमेश सावंत यांनी काम पाहिले.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ८ ऑगस्ट २०२६ रोजी निवती पोलीस स्थानकाचे अधिकारी व कर्मचारी केळुस तिठा येथे वाहन तपासणी करत असताना रात्री ११.३० वा. वेंगुर्ले ते मालवण जाणारी मारूती कार तपासली असता त्यात चार गोण्या पान मसाला व गुटखा आढळून आला. त्यामुळे वाहनचालक रामचंद्र लुडबे व प्रफुल्ल लुडबे यांना ताब्यात घेतले होते. तपासात जप्त मुद्देमाल हा मोहन परब याने त्यांना आणून दिल्याचे निष्पन्न झाले होते.

त्यानुसार आरोपींवर भा.न्या.सं. कलम १२३, २२३. २७१, २७५ व अन्न सुरक्षा अधिनियम कलम ५९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामुळे आरोपीला ९ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. त्यानंतर आरोपीने जामिनासाठी सत्र न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावर सुनावणी होत न्यायालयाने ५० हजार रुपयांचा जामिन मंजूर करताना तपास कामात सहकार्य करणे, साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा न करणे, पोलीस स्टेशनला हजेरी लावणे अशा अटी घालण्यात आल्या आहेत.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्लाप्रकरणी कोल्हापुरातील महिला अटकेत
September 21, 2026
Crime News : 'त्या' युवतीच्या आत्महत्येप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा
September 21, 2026
पुणे–राजापूर एसटीतून महिलेचे २.६२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
September 21, 2026