LIVE UPDATES

दिल्लीतील मंगोलपुरी भागात सहा पादचाऱ्यांवर चाकू हल्ला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी मंगोलपुरी भागातील 'एल' ब्लॉकमधील तीन वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये काही जणांच्या गटाने पादचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. यात किमान सहा जण जखमी झाले.
Edited by: Rajat Sawant
Published on: August 24, 2026 06:08 PM
views 118  views
Delhi Police investigating knife attacks on pedestrians in Mangolpuri

नवी दिल्ली : दिल्लीतील मंगोलपुरी भागात पादचाऱ्यांवर चाकूने हल्ला झाल्याची एक खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत सहा जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संध्याकाळी मंगोलपुरी भागातील 'एल' ब्लॉकमधील तीन वेगवेगळ्या गल्ल्यांमध्ये काही जणांच्या गटाने पादचाऱ्यांवर चाकूने हल्ला केला. यात किमान सहा जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी संजय गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आले आणि त्यापैकी दोघांना नंतर सफदरजंग रुग्णालयात हलवण्यात आले, असे पोलिसांनी सांगितले.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, पोलीस सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. यातून हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी मदत होणार आहे. संशयितांपैकी काही जण अल्पवयीन असल्याचे सांगण्यात येत आहे. प्राथमिक तपासावरून असे दिसून येते की हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला असावा. मात्र, स्थानिकांचा आरोप आहे की हल्लेखोरांनी लोकांची लूटमारही केली आणि या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, १७ ते २० वयोगटातील तीन तरुण त्यांच्याजवळ आले आणि त्यांच्या कामात अडथळा आणू लागले त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. 

पोलिसांनी सांगितले की, या वादादरम्यान एका आरोपीने पीडित व्यक्तीला पकडून ठेवले, तर दुसऱ्याने आपल्या साथीदाराच्या हातात चाकू दिला आणि त्याने पीडितेच्या पोटात वार केला. हल्ल्यानंतर आरोपी नांगलोई रेल्वे स्थानकाच्या दिशेने पळून गेले.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्लाप्रकरणी कोल्हापुरातील महिला अटकेत
September 21, 2026
Crime News : 'त्या' युवतीच्या आत्महत्येप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा
September 21, 2026
पुणे–राजापूर एसटीतून महिलेचे २.६२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
September 21, 2026