LIVE UPDATES

Tarun Tejpal rape case : तेजपाल यांना जन्मठेप द्या, गोवा सरकारची सर्वोच्च न्यायालयात याचिका

Goa government Supreme Court petition : तेजपाल यांची शिक्षा वाढवून ती जन्मठेपेपर्यंत करावी, अशी मागणी करणारी याचिका गोवा सरकारने दाखल केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या मागणीवर सुनावणीदरम्यान काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 19, 2026 04:12 PM
views 158  views

पणजी : 'तहलका' मासिकाचे संपादक तरुण तेजपाल यांना २०१३ मधील लैंगिक अत्याचाराच्या एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने १० वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर आता याप्रकरणी गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तेजपाल यांची शिक्षा वाढवून ती जन्मठेपेपर्यंत करावी, अशी मागणी करणारी याचिका गोवा सरकारने दाखल केली आहे. आता सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारच्या मागणीवर सुनावणीदरम्यान काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गोवा सरकारने याचिकेत म्हटले आहे की, गुन्ह्याचे गांभीर्य पाहता मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने सुनावलेली १० वर्षांची शिक्षा अत्यंत अपुरी आहे.हे प्रकरण जन्मठेप किंवा तत्सम शिक्षेसाठी पात्र आहे. शिवाय, शिक्षा एकाच वेळी भोगण्याचे आदेश दिले जाऊ नयेत.

यापूर्वी, ६ ऑगस्ट रोजी उच्च न्यायालयाने तेजपाल यांना बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवून १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली होती. मे 2021 मध्ये सत्र न्यायालयाने दिलेल्या निर्दोष मुक्ततेचा निर्णय गुरुवारी, मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने रद्द केला आणि २०१३ मधील महिला पत्रकारावरील लैंगिक अत्याच्यार प्रकरणात त्यांना दोषी ठरवले.

६२ वर्षीय तरुण तेजपाल यांना २०१३ मध्ये गोव्यात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान हॉटेलच्या लिफ्टमध्ये आपल्या कनिष्ठ सहकारी महिलेवर लैंगिक अत्याचारा केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले होते. तेजपाल यांनी आपण राजकीय कटाचे बळी ठरल्याचा दावा केला होता आणि उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले होते.



ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्लाप्रकरणी कोल्हापुरातील महिला अटकेत
September 21, 2026
Crime News : 'त्या' युवतीच्या आत्महत्येप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा
September 21, 2026
पुणे–राजापूर एसटीतून महिलेचे २.६२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
September 21, 2026