LIVE UPDATES

सरकारी कामात अडथळ्याप्रकरणी तिघांना कारावास

तोंडवली-बावशी ग्रामपंचायतीतील प्रकरण : आठ साक्षीदारांची तपासणी
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 03, 2026 07:55 PM
views 164  views

सिंधुदुर्गनगरी : तोंडवली-बावशी ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवकाला शिवीगाळ व धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी न्यायालयाने तिघांना कारावास आणि दंडाची शिक्षा सुनावली आहे.  याप्रकरणी सरकारी पक्षातर्फे ॲड. रुपेश देसाई यांनी काम पाहिले.

या प्रकरणात अतुल वासुदेव सदडेकर (वय ५८), मंदार राजाराम कुलकर्णी (४२) आणि प्रकाश रामचंद्र मेस्त्री (२८, तिघेही रा. तोंडवली, ता. कणकवली) या तिघांनाही तदर्थ न्यायाधीश १ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस एस इंदलकर यांनी २ वर्षे कारावास आणि प्रत्येकी ६ हजार रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

तोंडवली-बावशी ग्रामपंचायत कार्यालयात ८ एप्रिल २०२१ रोजी सकाळी अकराच्या सुमारास हा प्रकार घडला होता. २५ मार्च २०२१ रोजी झालेल्या ग्रामसभेत मंजूर झालेल्या टेंडरच्या ठरावाची प्रत आरोपींनी ग्रामसेव यांच्याकडे मागितली होती. ठरावाची प्रत मिळण्यासाठी लेखी अर्ज द्यावा लागेल आणि त्यानंतर प्रत देता येईल, असे ग्रामसेवक यांनी सांगितले. यावरून वाद निर्माण झाला.

आरोपींनी शिवीगाळ करून धमकी दिली तसेच शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप होता. त्यानुसार तत्कालीन ग्रामसेवक यांनी कणकवली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार कलम ३५३, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

खटल्याच्या सुनावणीदरम्यान आठ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. फिर्यादी यांनी घटनेचा सविस्तर घटनाक्रम न्यायालयासमोर मांडला, तर प्रत्यक्षदर्शी साक्षीदार योगेश नारिंग्रेकर यांच्या साक्षीनेही अभियोजनाच्या प्रकरणाला महत्त्वाचा आधार मिळाला. उपलब्ध साक्षी-पुराव्यांचा विचार करून न्यायालयाने तिन्ही आरोपींना दोषी ठरविले. कलम ३५३ अंतर्गत दोन वर्षांचा कारावास व तीन हजार रुपये दंड, कलम ५०४ अंतर्गत सहा महिन्यांचा कारावास व एक हजार रुपये दंड, तर कलम ५०६ अंतर्गत एक वर्षाचा कारावास व दोन हजार रुपये दंड, अशी शिक्षा सुनावण्यात आली आहे.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
वृद्धेच्या गळ्यातील सोनसाखळीवर डल्लाप्रकरणी कोल्हापुरातील महिला अटकेत
September 21, 2026
Crime News : 'त्या' युवतीच्या आत्महत्येप्रकरणी २६ वर्षीय तरुणावर गुन्हा
September 21, 2026
पुणे–राजापूर एसटीतून महिलेचे २.६२ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास
September 21, 2026