LIVE UPDATES

आयुष हॉस्पिटलची ओपीडी सावंतवाडीत सुरु करण्याबाबत धारगळीत बैठक

Edited by: विनायक गांवस
Published on: March 04, 2026 03:09 PM
views 557  views

सावंतवाडी : आयुष मंत्रालय आयुर्वेद संस्था गोवा या हॉस्पिटलची सावंतवाडी येथे ओ. पी. डी करण्याबाबत माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी आयुर्वेद संस्था धारगळ गोवा येथे बैठक घेतली. येथे चर्चा केल्यानंतर सावंतवाडी येथे आयुष हॉस्पिटलची ओपीडी सावंतवाडी लवकरच सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


माजी मंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांच्या विशेष प्रयत्नांमुळे सावंतवाडी येथे 'आयुष' हॉस्पिटलची ओपीडी लवकरच सुरू होणार असून यामुळे आरोग्य सुविधेत मोठी भर पडणार आहे. धारगळ (गोवा) येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये श्री. केसरकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत महत्त्वाची बैठक घेतली. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना आयुर्वेदातील जागतिक दर्जाच्या उपचार पद्धतीचा लाभ मिळावा, यासाठी सावंतवाडीत या संस्थेची ओपीडी सुरू करण्याची मागणी श्री. केसरकर यांनी केली होती. या चर्चेअंती प्रशासनाने सकारात्मक प्रतिसाद दिला असून, लवकरच ही सेवा कार्यान्वित होणार आहे अशी माहिती त्यांनी दिली.‌ यावेळी आयुष मंत्रालय आयुर्वेद संस्था गोवा यांच्या डॉक्टरांसह परिक्षित मांजरेकर, अर्चित पोकळे उपस्थित होते ‌


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Popcorn or Makhana for Weight Loss : पॉपकॉर्न की मखाना, वजन कमी करण्यासाठी काय 'बेस्ट'?
August 18, 2026
#ChandipuraVirus #GujaratHealthUpdate #HealthNews #MarathiNews #KokansadLive #BreakingNews
चंडीपुरा विषाणूने गुजरातमध्ये हातपाय पसरले
August 04, 2026
तणाव कमी करण्यासाठी 'हे' तीन उपाय ठरतील फायदेशीर, वाचा सविस्तर
July 30, 2026
Health Tips : पावसाळ्यात सर्दी-खोकला आणि तापापासून बचावासाठी अशी घ्या काळजी
July 28, 2026