LIVE UPDATES

Sindhudurg teacher recruitment 2026 : सिंधुदुर्ग जिल्हा परिषद अंतर्गत 282 शिक्षक पदांची भरती

पवित्र प्रणालीद्वारे भरती प्रक्रिया : 13 ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करण्याचे आवाहन
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 11, 2026 08:38 PM
views 871  views

सिंधुदुर्गनगरी : पवित्र प्रणालीमार्फत सन 2025-26 साठी महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी व्यवस्थापनाच्या शाळांमधील शिक्षक पदभरतीची प्रक्रिया सुरू आहे. ‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’मध्ये प्राप्त गुणांच्या आधारे ही भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत एकूण 282 शिक्षक पदे उपलब्ध करण्यात आली आहेत.

‘शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2025’ ही ऑनलाइन चाचणी 29 एप्रिल ते 5 मे 2025 या कालावधीत घेण्यात आली होती. चाचणीमध्ये प्राप्त गुण, उपलब्ध रिक्त पदे आणि शासनाच्या नियमानुसार आरक्षण विचारात घेऊन पवित्र पोर्टलवर पदांची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या एज्यूकेशन ऑफिसर प्रायमरी सिंधुदुर्ग (प्रायमरी) थेट नियुक्ती (Education Officer Primary SINDHUDURG (Primary) – Without Interview) या व्यवस्थापनाच्या शाळांसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या जाहिरातीस 21 जुलै 2026 रोजी मान्यता देण्यात आली असून, ती 6 ऑगस्ट 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.

या जाहिरातीमध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागासवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्ग तसेच खुल्या प्रवर्गासह विविध आरक्षण प्रवर्गांचा समावेश आहे. महिला, माजी सैनिक, अंशकालीन, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, खेळाडू आदी समांतर आरक्षणाचाही विचार करण्यात आला आहे. दिनांक 13 ऑगस्टपर्यंत प्राधान्यक्रम लॉक करणे आवश्यक असल्याने, पदभरतीसाठी पात्र उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर पदनिहाय प्राधान्यक्रम नोंदविणे आवश्यक आहे. यासाठी उमेदवारांनी https://tait2025.mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर लॉगिन करून प्राधान्यक्रम जनरेट करावेत.

उमेदवारांना 6 ऑगस्ट ते 13 ऑगस्ट 2026 या कालावधीत पदनिहाय पसंतीक्रम नोंदवून तो लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. त्यामुळे पात्र उमेदवारांनी अंतिम मुदतीपूर्वी प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण करावी. उमेदवारांची प्राधान्यक्रमाची कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर मुलाखतीशिवाय शिक्षक पदभरतीसाठी गुणवत्तायादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी अंतिम प्राधान्यक्रम नोंदविण्यापूर्वी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली पदांची संख्या, विषय व पदनिहाय तपशील, आरक्षण, शैक्षणिक व व्यावसायिक पात्रता तसेच इतर अटी व शर्ती काळजीपूर्वक तपासाव्यात. पवित्र पोर्टलवरील संबंधित जाहिरातीत नमूद केलेली माहितीच अंतिम राहणार आहे. पदभरती प्रक्रियेबाबत काही आक्षेप किंवा अडचणी असल्यास उमेदवारांनी आपले म्हणणे [email protected] या ई-मेलवर पाठवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg DCC Bank 67 Clerk Posts
Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठीच्या भरतीला मुदतवाढ
September 18, 2026
शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेत उमेदवारांची गर्दी
September 03, 2026
Sindhudurg Bank Clerk Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
September 01, 2026
Sindhudurg ZP Teacher Recruitment
Sindhudurg Zilla Parishad Teacher Recruitment : पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची ३ सप्टेंबरला पडताळणी
September 01, 2026