LIVE UPDATES

Sindhudurg DCC Bank Recruitment : सिंधुदुर्ग बँकेत शिपाई पदाच्या ३२ जागांसाठी भरती

२० ते ३० ऑगस्ट पर्यंत भरता येणार ऑनलाईन अर्ज : ६ सप्टेंबर रोजी परीक्षा
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: August 20, 2026 10:34 PM
views 7879  views
Sindhudurg DCC Bank 32 Peon post Recruitment

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमधील कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेल्या शिपाई पदांवर भरतीसाठी सहकार खात्याकडे प्रस्ताव सादर करण्यात आला होता. सहकार खात्याकडून ३२ रिक्त शिपाई पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑफलाईन पद्धतीने करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार बँकेने कोल्हापूर जिल्हा नागरी बँक्स असोसिएशन लिमिटेड, कोल्हापूर या संस्थेची निवड केली असून त्या संस्थेमार्फत भरती प्रक्रिया प्रोसेस सुरू केली आहे. (Sindhudurg DCC Bank Peon Recruitment 2026)

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य 

 ३२ रिक्त शिपाई पदांची सरळ सेवा भरती प्रक्रियेमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे. यासाठी उमेदवाराने ऑनलाईन अर्ज भरताना जिल्ह्यातील रहिवाशी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) अपलोड करणे आवश्यक आहे. तसेच शिपाई पदासाठी किमान २१ व कमाल ४० वर्षे  वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. त्यासाठी उमेदवाराचा जन्म ३०/०८/२००५ नंतरचा व ३०/०८/१९८६ यापूर्वीचा नसावा. (Sindhudurg DCC Bank Recruitment: 32 Peon Posts Announced)

उमेदवाराची शैक्षणिक पात्रता

शिपाई पदासाठी उमेदवाराची शैक्षणिक पात्रता १२ वी पास असणे आवश्यक आहे. या पदांसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज २० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट पर्यंत भरता येणार आहेत. पदभरतीची जाहिरात असोसिएशनच्या http://www.kopbankasso.co.in या अधिकृत संकेतस्थळावर २० ऑगस्ट ते ३० ऑगस्ट पर्यंत पहावयास उपलब्ध राहील.

परिक्षे संबंधी माहिती

शिपाई पदाच्या भरतीसाठी रविवारी ६ सप्टेंबर २०२६ रोजी परिक्षा घेण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात परिक्षा केंद्र दिले जाणार आहे. उमेदवाराला कॉल लेटर इत्यादी माहिती उमेदवाराच्या मेलवर पाठविली जाईल. उमेदवाराने कॉल लेटर डाऊनलोड करून त्याची प्रत काढावयाची आहे. उमेदवार परीक्षा केंद्रावर जाताना परीक्षा कॉल लेटर, सहीत ओळखीसाठी आधारकार्ड/पॅनकार्ड (ओरिजनल) सोबत असणे आवश्यक राहील. परिक्षेचा निकाल जाहीर झाल्यानंतर त्यामधून गुणानुक्रमे आवश्यक उमेदवारांना तोंडी मुलाखतीस बोलविणेत येईल.

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरणे अनुषंगाने काही शंका असल्यास त्यांनी एजन्सीच्या [email protected] या ईमेलवर अथवा ७४९८८५०४२९ या मोबाईल नंबर वर संपर्क साधावा, असे आवाहन बँकेमार्फत करण्यात आले आहे. 


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg DCC Bank 67 Clerk Posts
Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठीच्या भरतीला मुदतवाढ
September 18, 2026
शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेत उमेदवारांची गर्दी
September 03, 2026
Sindhudurg Bank Clerk Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
September 01, 2026
Sindhudurg ZP Teacher Recruitment
Sindhudurg Zilla Parishad Teacher Recruitment : पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची ३ सप्टेंबरला पडताळणी
September 01, 2026