LIVE UPDATES

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेत ४३ लिपिक पदांची भरती

ऑनलाईन अर्ज प्रक्रिया ७ सप्टेंबरपासून
Edited by: लवू म्हाडेश्वर
Published on: September 03, 2025 02:11 PM
views 702  views

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्मचाऱ्यांच्या सेवामुक्तीमुळे रिक्त झालेल्या ४३ लिपिक पदांच्या भरतीसाठी सहकार खात्याकडून मान्यता मिळाली असून, सरळ सेवा भरती प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया आयबीपीएस संस्थेमार्फत पार पडणार असून, अर्ज करण्याची सुविधा दि. ५ सप्टेंबर २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५ या कालावधीत उपलब्ध राहणार असून, जिल्ह्यातील पात्र उमेदवारांनी या भरती प्रक्रियेचा लाभ घ्यावाच आव्हान जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे. 

यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अतुल काळसेकर, संचालक दिलीपराव राणे, गजानन गावडे, प्रज्ञा ढवण , नीता राणे,रवींद्र मडगावकर, गणपत देसाई, प्रकाश मोरये, समीर सावंत, जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना अध्यक्ष मनीष दळवी म्हणाले की,भरती प्रक्रियेत अर्ज करण्यासाठी उमेदवारांकडे संगणकीय ज्ञानाबरोबरच बँकिंग क्षेत्रातील आवश्यक पात्रता असणे अपेक्षित आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरताना जिल्ह्याचा अधिवास दाखला (Domicile Certificate) अपलोड करणे बंधनकारक आहे. वयोमर्यादा किमान २१ वर्षे व कमाल ३८ वर्षे इतकी ठेवण्यात आली आहे. तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना शासनमान्य सवलत मिळणार आहे.

अर्ज प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणार असून, परीक्षा केंद्रे सिंधुदुर्ग, रत्नागिरी, कोल्हापूर, पुणे, मुंबई येथे असणार आहेत. परीक्षेनंतर निकाल ७ ते १० दिवसांत जाहीर होणार असून, गुणपत्रक डाउनलोड करता येईल.

अधिकृत माहिती व अर्ज करण्यासाठी बँकेच्या संकेतस्थळाला www.sindhudurgdcc.com भेट द्यावी.असे आवाहन जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले आहे.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Sindhudurg DCC Bank 67 Clerk Posts
Sindhudurg DCC Bank Recruitment 2026 : सिंधुदुर्ग बँकेच्या ६७ लिपिक पदांसाठीच्या भरतीला मुदतवाढ
September 18, 2026
शिक्षक भरतीसाठी जिल्हा परिषदेत उमेदवारांची गर्दी
September 03, 2026
Sindhudurg Bank Clerk Recruitment : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या लिपिक पदांच्या भरती प्रक्रियेस प्रारंभ
September 01, 2026
Sindhudurg ZP Teacher Recruitment
Sindhudurg Zilla Parishad Teacher Recruitment : पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची ३ सप्टेंबरला पडताळणी
September 01, 2026