LIVE UPDATES

Nitesh Rane Modi Express : पहिली 'मोदी एक्सप्रेस' सिंधुदुर्गाच्या दिशेने रवाना..

आमदार नितेश राणे यांनी दादर रेल्वे स्टेशनवर दाखवला झेंडा : चाकरमानी गणेशभक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Edited by: कोकणसाद LIVE NEWS नेटवर्क
Published on: September 11, 2026 02:09 PM
views 525  views
Ganeshotsav 2026 Nitesh Rane Flags Off Modi Express From Dadar

मुंबई : गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री, तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता सोडण्यात आलेली दादर ते सावंतवाडी पर्यंतची मोदी एक्स्प्रेस ही पहिली ट्रेन आज दुपारी 12 वाजता दादर स्टेशनवरून कोकणाकडे रवाना झाली. प्रवाशांच्या उत्साहात, बाप्पाच्या जयघोषात ही रेल्वे सिंधुदुर्ग साठी रवाना झाली. मंत्री नितेश राणे यांनी दादर स्टेशनवर मोदी एक्स्प्रेसला झेंडा दाखवला. 

गणेशोत्सवाच्या काळात आरक्षण मिळत नाही, खासगी गाड्यांचे वाढलेले तिकीट यामुळे चाकरमान्यांना तिकीट मिळण्यास अडचणी निर्माण होतात अशा वेळी मोदी एक्सप्रेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला आहे.

गेली 14 वर्षे अविरतपणे मंत्री नितेश राणे यांनी स्वखर्चाने गणेशभक्तांना प्रवासाची मोफत सुविधा दिली आहे. दुसरी मोदी एक्सप्रेस ट्रेन रविवार 13 सप्टेंबर रोजी रवाना होणार आहे. दरवर्षी राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Maharashtra Board Exam 2027 : 10 वी, 12 वी बोर्डाच्या परीक्षेचे संभाव्य वेळापत्रक जाहीर
September 18, 2026
दिघी येथे ग्रीनफिल्ड जहाजबांधणी औद्योगिक समूह उभारणीसाठी सामंजस्य करार
September 15, 2026
देहविक्रयाच्या प्रश्नावरील ‘अर्ज मधील दिवस’ पुस्तकाचे २८ सप्टेंबरला प्रकाशन
September 11, 2026
Nitesh Rane Visit Praka Engineering Shipyard
Nitesh Rane : जहाजबांधणी उद्योगातून रोजगाराची क्रांती शक्य!
September 10, 2026