LIVE UPDATES

मुक्ताई ॲकेडमीतर्फे 2 ऑगस्टला सावंतवाडीत कॅरम स्पर्धा

शालेय विद्यार्थ्यांसाठी पर्वणी
Edited by: कोकणसाद LIVE न्यूज नेटवर्क
Published on: July 26, 2026 11:30 AM
views 152  views
#kokansadlive#news update#konkan update# Carrom tournament in Sawantwadi

मुक्ताई ॲकेडमीतर्फे 2 ऑगस्ट रोजी सावंतवाडीत विद्यार्थ्यांसाठी कॅरम स्पर्धा

                                   

सिंधुदुर्ग : जिल्हा कॅरम असोसिएशनचे संस्थापक कै.सुर्यकांत बाळकृष्ण पेडणेकर यांच्या स्मरणार्थ मुक्ताई ॲकेडमीने शालेय विद्यार्थ्यांसाठी सावंतवाडी शहर मर्यादित कॅरम स्पर्धेचे आयोजन केले आहे. खासकिलवाडा येथील पाटणकर वाड्यातील मुक्ताई ॲकेडमीच्या प्रशिक्षण केंद्रात कॅरम स्पर्धा घेण्यात येणार आहे. 

स्पर्धेत सावंतवाडी शहरातील शाळांमधील मर्यादित विदयार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल. विद्यार्थ्यांसाठी पहिल्यांदाच अशा स्पर्धेचे आयोजन करुन त्यांना प्रोत्साहन देण्याचा उददेश असल्याचे मुक्ताई ॲकेडमीचे अध्यक्ष कौस्तुभ पेडणेकर यांनी सांगितले. ही स्पर्धा पहिली ते तिसरी, चौथी ते सहावी आणि सातवी ते दहावी अशा तीन गटात खेळविण्यात येईल. प्रत्येक गटातील चार विजेत्यांना रोख रक्कम, मेडल, चषक आणि प्रशस्तीपत्र देण्यात येईल. त्याचबरोबर प्रत्येक गटातील तीन मुलींना प्रोत्साहनपर पारितोषिके देण्यात येतील. सहभाग घेणा-या विदयार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धेसाठी नावनोंदणीची अंतिम तारीख शनिवार 1 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत आहे. नाव नोंदणी आणि अधिक माहितीसाठी कौस्तुभ पेडणेकर मोबाईल क्रमांक 8007382783 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन सरचिटणीस सौ.स्नेहा पेडणेकर यांनी केले आहे. आयोजकांचा निर्णय सर्वांसाठी अंतिम आणि बंधनकारक राहील.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Asian Games Hockey India Thrash Indonesia 13-1 in Opening Match
India vs Indonesia Asian Games Hockey : हॉकीत भारताचा इंडोनेशियावर १३-१ असा दणदणीत विजय
September 21, 2026
India vs Afghanistan 2nd T20I : आज नवी दिल्लीत रंगणार भारत-अफगाणिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना
September 15, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरच्या आखाड्यात रंगली कुस्तीची चुरस
September 11, 2026
India Women enter Asia Cup 2026 final
IND W vs BAN W : भारतीय महिला संघाची आशिया कप फायनलमध्ये 'एन्ट्री', शफाली वर्माने झळकावले अर्धशतक
September 11, 2026