LIVE UPDATES

IND vs AFG T20I series : क्रिकेट चाहत्यांना 'येथे' पाहता येणार भारत-अफगाणिस्तान टी 20 मालिकेचे सामने

IND vs AFG T20I Series 2026 : श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात ईशान किशन, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे, तर जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा यांचा सहभाग त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. दरम्यान, स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून, त्याला खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 08, 2026 05:06 PM
views 2298  views

मुंबई : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिका १३ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. हे सर्व सामने नवी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवले जातील. दुसरा सामना १५ सप्टेंबरला, तर तिसरा सामना १७ सप्टेंबरला होणार आहे. या मालिकेचे यजमानपद अफगाणिस्तानकडे आहे. 

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघात ईशान किशन, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांचा समावेश आहे, तर जसप्रीत बुमराह आणि हर्षित राणा यांचा सहभाग त्यांच्या तंदुरुस्तीवर अवलंबून असेल. दरम्यान, स्टार अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदर दुखापतीतून पूर्णपणे सावरला असून, त्याला खेळण्यासाठी तंदुरुस्त घोषित करण्यात आले आहे.

दुसरीकडे, इब्राहिम झद्रानच्या नेतृत्वाखालील अफगाणिस्तान संघात रशीद खान, रहमानुल्ला गुरबाज, सेदिकुल्ला अटल आणि अजमतुल्ला ओमरझाई यांसारख्या बड्या खेळाडूंचा समावेश आहे.

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांची टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकांचे सामने प्रेक्षक सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहू शकतात. भारत-अफगाणिस्तान मालिकेचे प्रसारण हक्क सोनी पिक्चर्स नेटवर्क्सने मिळवले आहेत. तिन्ही टी-२० सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील. 

भारताचा टी २० संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन, इशान किशन, टिळक वर्मा, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती.

अफगाणिस्तानचा टी २० संघ

इब्राहिम झद्रान (कर्णधार), रहमानुल्ला गुरबाज (यष्टिरक्षक), नूर रहमान (यष्टिरक्षक), अब्दुल्ला अहमदझाई, नवीन-उल-हक, सेदिकुल्ला अटल, दरविश रसुली, अजमतुल्ला ओमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, राशिद खान, नांगेयालिया खरोटे, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजलहक फारुकी.


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Asian Games Hockey India Thrash Indonesia 13-1 in Opening Match
India vs Indonesia Asian Games Hockey : हॉकीत भारताचा इंडोनेशियावर १३-१ असा दणदणीत विजय
September 21, 2026
India vs Afghanistan 2nd T20I : आज नवी दिल्लीत रंगणार भारत-अफगाणिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना
September 15, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरच्या आखाड्यात रंगली कुस्तीची चुरस
September 11, 2026
India Women enter Asia Cup 2026 final
IND W vs BAN W : भारतीय महिला संघाची आशिया कप फायनलमध्ये 'एन्ट्री', शफाली वर्माने झळकावले अर्धशतक
September 11, 2026