LIVE UPDATES

IND vs AFG T20I Series : अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा, 'या' १५ खेळाडूंना संधी

India squad for Afghanistan T20I series 2026 : आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंचाच या टी-२० मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, काही खेळाडूंची निवड ही त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे.
Edited by: Rajat Sawant
Published on: September 02, 2026 09:01 PM
views 830  views
India squad for Afghanistan T20I series 2026

नवी दिल्ली : अफगाणिस्तानविरुद्धच्या आगामी टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर १३ सप्टेंबरपासून या दोन संघांमध्ये तीन सामन्यांची मालिका खेळवली जाईल. १५ खेळाडूंचा समावेश असलेल्या या संघाचे नेतृत्व श्रेयस अय्यर करणार आहे.

आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी निवडलेल्या खेळाडूंचाच या टी-२० मालिकेसाठी समावेश करण्यात आला आहे. दरम्यान, काही खेळाडूंची निवड ही त्यांच्या फिटनेसवर अवलंबून असेल. अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी यष्टिरक्षक म्हणून संजू सॅमसनची निवड करण्यात आली आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या मालिकेसाठी युवा फलंदाज वैभव सूर्यवंशी यानेही संघात स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर आणि नितीश कुमार रेड्डी या चार खेळाडूंची निवड ही फिटनेस चाचण्या उत्तीर्ण होण्याच्या अटीवर करण्यात आली आहे.

'या' दिवशी खेळवले जाणार सामने

अफगाणिस्तान संघाविरुद्धचा पहिला सामना १३ सप्टेंबरला, दुसरा १५ सप्टेंबरला आणि अंतिम सामना १७ सप्टेंबरला खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७ वाजता सुरू होतील.


अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघ

श्रेयस अय्यर (कर्णधार), अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), टिळक वर्मा (उपकर्णधार), शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, हर्षित राणा.

भारताविरुद्ध अफगाणिस्तानचा संघ

इब्राहिम जादरान (कर्णधार), रहमानुल्लाह गुरबाज (यष्टीरक्षक), नूर रहमान (यष्टीरक्षक), सेदिकुल्लाह अटल, दरविश रसूली, अजमतुल्लाह उमरजई, गुलबदीन नायब, मोहम्मद नबी, राशिद खान, नांग्याल खरोटी, नूर अहमद, मुजीब उर रहमान, फजल हक फारूकी, अब्दुल्ला अहमदजई, नवीन-उल-हक 


ताजी बातमी

View all

Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
Docker संरचना काम करता जाल्यार चांचणी करप
October 22, 2026
सिंधुदुर्ग हादरला! कुडाळमध्ये २३ वर्षीय तरुणीची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या
October 17, 2026
कमी पावसामुळे शेतीचे नुकसान झालेल्या भागात जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांची पाहणी
September 24, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरमध्ये साकारणार ‘ताज’चे आलिशान हॉटेल
September 22, 2026
संबंधित बातम्या

View all

Asian Games Hockey India Thrash Indonesia 13-1 in Opening Match
India vs Indonesia Asian Games Hockey : हॉकीत भारताचा इंडोनेशियावर १३-१ असा दणदणीत विजय
September 21, 2026
India vs Afghanistan 2nd T20I : आज नवी दिल्लीत रंगणार भारत-अफगाणिस्तान टी 20 मालिकेतील दुसरा सामना
September 15, 2026
#kokansadlive#news update#konkan update#
कुणकेश्वरच्या आखाड्यात रंगली कुस्तीची चुरस
September 11, 2026
India Women enter Asia Cup 2026 final
IND W vs BAN W : भारतीय महिला संघाची आशिया कप फायनलमध्ये 'एन्ट्री', शफाली वर्माने झळकावले अर्धशतक
September 11, 2026